Sunday, January 29, 2023
Home Uncategorized कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जिंकण्यासाठी तयारीला लागा – आ. जवळगावकर -NNL

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जिंकण्यासाठी तयारीला लागा – आ. जवळगावकर -NNL

निवडणूक पूर्व नियोजन तयारीसाठी आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी घेतली होती बैठक

by nandednewslive
0 comment

हिमायतनगर। कृषी उत्पन्न बाजार समिती च्या होणाऱ्या निवडणुकी पुर्वी कांग्रेस पक्षाच्या प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागायचे असुन, हि होणारी निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असणारी निवडणूक आहे. त्यासाठी प्रत्येकांनी तयारीला लागायचे असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी बैठकीत सांगितले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात जवळगाव येथे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक, हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष,सदस्य यांची उपस्थिती होती. या बैठकीत आ. जवळगावकर म्हणाले की येत्या काही दिवसात कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम लागणार आहे. त्यामुळे आजपासून कांग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच, चेअरमन, यांनी तयारी करायची असुन हि निवडणुक आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपंचायतची तालीम असुन त्यामुळे हि निवडणुक जिंकण्यासाठी प्रत्येकांनी तण मनाने काम करायचे असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले आहे. यावेळी अनेकांनी प्रश्न मांडले होते.

यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, संचालक गणेश शिंदे, सुभाष राठोड, रफिकभाई, प्रल्हाद पाटील, प्रथम नगराध्यक्ष अ. आखील,डॉ प्रकाश वानखेडे, कैलास माने,संदीप पळशीकर, फेरोज खान, संजय माने, गोविंद बंडेवार,सोपान बोंपीलवार,समद खान, अ.बाकी, जनार्दन ताडेवाड, जोगेंद्र नरवाडे, प्रविण जाधव, दिलीप पार्डीकर,फेरोज खुरेशी, यांच्यासह चेअरमन, सरपंच, उपसरपंच, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!