हिमायतनगर,अनिल मादसवार| क्रिकेटचे सामने घेताना आलेल्या खेळाडूंना सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे. क्रिकेट सुरु असताना कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेता विचारपूर्वक घ्यावा. चुकीचा निर्णय दिला जाणार नाही याची खबरदारी घेतली तर क्रिकेटचे सामने सुरळीत होतील. आणि कोणत्याही संघावर किंवा खेळाडूवर अन्याय होणार नाही. यासाठी विचारपूर्वक निर्णय द्यावा अश्या सूचना आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी क्रिकेट सामने आयोजित करणाऱ्या कमिटीला केल्या.
ते हिमायतनगर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या ड्रीम सिटी प्लॉटिंगच्या मैदानावर स्वर्गीय पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचे दि.२० डिसेंबर रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या सुरुवातीला स्वर्गीय पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या क्रिकेट कमिटीच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर नियोजित ड्रीम सिटी जुन्या तहसीलच्या बाजूला असलेल्या मैदानावर विरसनी आणि आष्टी येथील खेळाडूंत होणाऱ्या क्रिकेटच्या पहिल्या सामन्याचे उदघाटन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बेटिंग केली तर प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई यांनी बॉलिंग केल्याने सामन्याला सुरुवात झाली.
या क्रिकेटच्या सामन्यात सहभाग घेऊन विजयी झालेल्या क्रिकेट संघाला पहिले बक्षीस ७० हजार ७०७ रुपये आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. तर दुसरे बक्षीस ५० हजार ७०७ रुपये प्रसिद्ध व्यापारी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ यांच्यावतीने दिले जाणार आहे. तर ३० हजार ७०७ रुपयाचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई यांच्या तर्फे ठेवण्यात आले असून, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ११ हजार ७०७ रुपये युवा कार्यकर्ता अब्दुल मतीन खालिद यांच्यातर्फे दिले जाणार आहे.
यावेळी पुढे बोलताना आ.माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले कि, सर्वानी खेळीमेळीच्या वातावरणात सामने पार पडले पाहिजे यात कोणाचेही मन नं दुखविता आनंदाने सामने व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांच्यासह जेष्ठ कार्यकर्त्यांनी वेळोवेळी येथील मैदानावर भेट देऊन सामने सुरळीत पार पडत आहेत कि नाही याकडे लक्ष द्यावे अश्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, मुख्याधिकारी शामकांत जाधव, सुभाष राठोड, जनार्धन ताडेवाड, रफिक सेठ, गणेशराव शिंदे, अखिल भाई, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, समद भाई, संजय माने, गोविंद बंडेवार, ज्ञानेश्वर शिंदे, बाकी सेठ, फेरोज कुरेशी, पंडित ढोणे, आदींसह अनेकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन परमेश्वर गोपतवाड यांनी केले. या स्पर्धेत जास्तीत जास्त क्रिकेट संघानी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक प्रशांत देवकते, किरण माने, अरविंद पाटील, आजिम खुरेशी यांनी केले आहे.