अर्धापूर। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पार्थ व पवन बेतीवार ह्या जुळ्या भावंडांच्या वाढदिवसानिमित्त कै .लक्ष्मीबाई सेवा भावी संस्था पार्डी (म )यांच्या तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी शाळेतील १८८ विद्यार्थ्यांच्या दंत तपासणी करून पेस्ट ,ब्रश व माऊथ फ्रेशनर मोफत वाटप केले .या दंतरोग तपासणीसाठी डॉ .अभिलाषा बेतीवार , डॉ .किरण सुनेवार ,डॉ .प्राची पावडे यांनी विद्यार्थ्यांच्या दंतची तपासणी केली आहे .पार्थ व पवन बेतीवार ह्या विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत दंत तपासणी करून विद्यार्थ्यांना वाढदिवस साजरा केला यावेळी आजी – आजोबा ,काका – काकू ,आई – वडील उपस्थित होते .या कार्यक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मारोतराव देशमुख हे होते,तर प्रमुख पाहुणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुराव भांगे तर सरपंच संघटनेचे निळकंठराव मदने,राजाबाई विद्यालयाचे प्राचार्य शरदराव देशमुख, पत्रकार नागोराव भांगे पाटील , पत्रकार युनूसमिया नदाफ ,ग्रामपंचायत सदस्य हनुमंतराव देशमुख ,नितीन लेकुळे,शेख गुलाब ,नागेश देबगुंडे, मारोती मदने, सुरेश बंडाळे,गोविंद भांगे,बाळू कड व जि प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश देशमुख ,सहशिक्षक योगाजी कल्याणकर ,रमेश पावडे ,मंगला सलामे उपस्थित होते ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव भोसले यांनी केले तर आभार उषा नळगिरे यांनी मानले.