
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। जिल्हा परिषद नांदेड, क्रीडा विभाग. आयोजित तालुका व जिल्हास्तरीय मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. दि.12/12/2022 रोजी कुष्णुर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धां आयोजन तर जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन दि.17/12/2022 सायन्स कॉलेज नांदेड येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेत विविध मैदानी क्रीडा प्रकार घेण्यात आले त्यात प्रामुख्याने थाळीगोळा,गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, तिहेरी लांब उडी, रिले, खो-खो, कब्बडी अशा विविध प्रकारांचा अंतर्भाव होता. त्यात ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव. या शाळेच्या 58 विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेतआपला सहभाग नोंदविला होता व त्यापैकी 29 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात प्रथम पारितोषिक पटकावले (29सुवर्ण पदक) तर 27 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यात जिल्हास्तरीय स्पर्धेत शाळेच्या 3 विद्यार्थ्यांनी चार पदकांची कमाई केली.

त्यात शेख अबुझर याने थालीफेक मध्ये सुवर्णपदकाची तर गोळाफेक मध्ये रजत पदकाची कमाई केली. कृष्णा श्रीगोपलवार याने तिहेरी लांबउडी मध्ये सुवर्ण पदक मिळविले. तसेच हणमंत फंताडे याने थाळीफेक क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावले. या तिन्ही विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर होणाऱ्या मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

या त्यांच्या घवघवीत यशाबद्दल शाळेचे सचिव माननीय श्री कुमुदकांत पटेल सर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या या यशाबद्दल कौतुकही केले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. सरोज धरणे मिस उपस्थित होत्या. तसेच क्रीडा शिक्षक शरद कपाटे सर, सहशिक्षक विलास भालेराव सर, श्री अर्जुन बैस सर , आनंद पांचाळ सर हे उपस्थित होते तसेच शाळेतील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. व पुढील त्यांच्या कार्यास त्यांना हार्दिक शुभेच्छा ही दिल्या.

