Sunday, January 29, 2023
Home Uncategorized जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने माळेगाव यात्रेचे भव्‍य नियोजन पाच दिवस विविध कार्यक्रम; संदीप माळोदे यांची माहिती -NNL

जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने माळेगाव यात्रेचे भव्‍य नियोजन पाच दिवस विविध कार्यक्रम; संदीप माळोदे यांची माहिती -NNL

जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी पत्रकार परिषद

by nandednewslive
0 comment

नांदेड, अनिल मादसवार। दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्‍हा परिषद नांदेडतर्फे तीर्थक्षत्र माळेगाव यात्रेचे नियोजन करण्‍यात आले असून दिनांक 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2022 दरम्‍यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे, अशी माहीती जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, पंचायत विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे, नरेगाचे उपजिल्‍हा कार्यक्रम समन्‍वयक व्‍ही.आर.पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.

माळेगाव यात्रेत यात्रेकरूंना पाण्याची सुविधा, विद्युत पुरवठा करण्यात आलेली आहे. घोडा व गाढव लाईनमध्ये पाणीपुरवठ्याची सुविधा, स्‍टॉल परिसरात जलकुंभची सुविधा करण्‍यात आली आहे. माळेगाव यात्रेत दाखल होणा-या पशु व प्राण्‍यांसाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने रुग्णालयाची स्थापना करण्‍यात आली असून उपचारांची व्‍यवस्‍थाही करण्‍यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने देखील फिरते रुग्णालय, ॲम्बुलन्ससह डॉक्‍टर व आरोग्‍य कर्मचा-यांचे पथक पूर्णवेळ यात्रेत राहणार आहे. कृषी विभागाच्‍या वतीने भव्‍य कृषी प्रदर्शन भरविण्‍यात येणार असून यात सुमारे शंभर कृषीचे स्‍टॉल उभारले जाणार आहेत. जिल्‍हा परिषदेच्‍या कृषी विभागाचे वर्ष 2021-22 व 2022-23 वर्षातील कृषीनिष्ठ पुरस्‍कार प्राप्‍त शेतकऱ्याना माळेगावात पुरस्कार देवून सन्‍मान करण्‍यात येणार असल्‍याची माहितीही संदीप माळेादे यांनी दिली आहे.

माळेगाव येथे आज दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता देवस्‍वारी व पालखी पूजन मंत्री, ग्राम विकास व पंचायतीराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीशजी महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी राज्‍याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतभाऊ पाटील, लातुर लोकसभेचे खासदार सुधाकरराव शृंगारे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार शामसुंदर शिंदे पाटील, आमदार भीमराव केराज, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार मोहनअण्‍णा हंबर्डे, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासन वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माळेगावच्‍या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे यांची उपस्थिती राहणार आहे.

दुपारी 3 वाजता महिला व बालकांसाठी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार मोहनअण्‍णा हंबर्डे, आमदार जितेश अंतापुरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, पंचायत विभागाच्‍या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेखच्‍या सुरेखा सेठिया, महिला व बालकल्याण विभागाच्‍या जिल्‍हा कार्यक्रम अधिकारी आर.पी. काळम, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, अर्धापूरच्‍या गट विकास अधिकारी अर्धापूर एम.जे. रावताळे यांची उपस्थिती राहणार आहे.

banner

सायंकाळी 4 वाजता भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात असून  खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार शामसुंदर शिंदे पाटील, आमदार राजेश पवार, आमदार तुषार राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा कृषी अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे, कार्यकारी अभियंता बांधकाम ए.आर. चितळे, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी ए. एन. भोजराज यांची उपस्थिती राहणार आहे.

दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आश्व, श्वान कुक्‍कुट प्रदर्शन व विविध स्पर्धेचे उद्घाटन खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून खासदार सुधाकरराव श्रृगारे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार शामसुंदर शिंदे पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपायुक्त पशुसंवर्धन मधुसूदन रत्नपारखे, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, पाणी व स्‍वछता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांची उपस्थिती राहणार आहे.

दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता कुस्त्यांची प्रचंड दंगल होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शामसुंदर शिंदे पाटील यांच्या हस्ते करण्‍यात येणार आहे. विशेष उपस्थिती म्हणून खासदार सुधाकरराव श्रृंगारे, आमदार भीमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्‍हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम जी.एच. राजपूत, अधीक्षक अभियंता महावितरण सुधाकर जाधव, अशिक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग सुनील पाटील, जिल्हा व्यवस्थापक बीएसएनएलचे पवनकुमार बारापत्रे, कंधारचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांची उपस्थिती राहणार आहे.

दिनांक 25 डिसेंबर रोजी लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार असून लावणी महोत्सवाचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून खासदार सुधाकरराव शृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, आमदार मोहनअण्‍णा हंबर्डे, आमदार राजेश पवार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ.अ.कानडे,  जिल्हा कोषागार अधिकारी अभय मधुसूदन चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार एम.डी. थोरात, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणकचक प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्‍ना, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदींची उपस्थिती राहणार आहे.

दिनांक 26 डिसेंबर रोजी पारंपारिक लोककला महोत्सव होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार शामसुंदर शिंदे पाटील, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे. नरेगाचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक व्‍ही.आर. पाटील, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.

सायंकाळी 4 वाजता यात्रेतील विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि समारोप कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  मंजुषा जाधव, कार्यकारी अभियंता बांधकाम एस.जी. गंगथडे, सागर तायडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, गट विकास अधिकारी शैलेंद्र वाव्‍हळे, ए.एन. मांजरमकर, मिथुन नागमवाड, राजकुमार मुक्कावार, एस.ए. धन्‍वे, विठ्ठल सुरोसे, एस.जी. कांबळे, मयूर अंदेलवाड, अमित राठोड, एस.एच. बळदे, एम.डी. जाधव,एस.यु. देशमुख, आर.एस. बजाज व एल.आर. वाजे यांची उपस्थिती राहणार आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!