
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। शालेय क्रीडा स्पर्धा 2022 अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जनता कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश मिळविले.

यात 19 वर्ष गट मुले 1500 मी धावणे प्रथम कांबळे जयवर्धन,200 मी धावणे द्वितीय इबितदार ओंकार, लांब उडी प्रथम मोरे मनिष, उंच उडी प्रथम गायकवाड प्रशांत, भाला फेक प्रथम मोरे मनिष, थाळी फेक प्रथम गायकवाड प्रशांत, गोळा प्रथम शेख समीर, गोळा द्वितीय शेख अय्याज, हार्डल्स 110 मी प्रथम गायकवाड प्रशांत, रिले 100 प्रथम शेख रजा, भोळे केतन, इबितदार ओंकार, गायकवाड प्रशांत, कबड्डी मध्ये द्वितीय, क्रिकेट मधे द्वितीय.

19 वर्ष खालील मुली गटाने 100मी धावणे प्रथम सोनकांबळे दीपाली,200मी धावणे प्रथम माने संजीवनी, गोळा भला थाळी फेक प्रथम ठाकूर निकिता, लांब उडी द्वितीय श्रीमंगले मयुरी, रिले प्रथम 100 कुऱ्हाडे मयुरी, शिंदे प्रिया, राखे गीता, श्रीमंगले मयुरी यांनी यश मिळविले तसेच यांची जिल्हा स्तरीय स्पर्धे साठी निवड झाली आहे.

या विध्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रा. बैस डी. आर. / शिंदे संगमेश्वर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. वसंतराव पाटील चव्हाण सचिव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण प्राचार्य के. जी. सूर्यवंशी उप प्राचार्य प्रा. पवार पर्यवेक्षक प्रा. देवडे पर्यवेक्षिका प्रा. सौ. शिंदे मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

