नांदेड। नेरळ जिल्हा रायगड या ठिकाणी वयोगट १४ वर्षातील मुलीच्या संघात या खेळाडूंनी कर्णधार व उपकर्णधार म्हणून खेळाची पारी सांभाळत खेळ खेळत व्यवस्थित रित्या आपल्या संघाला सेमी फायनल पर्यंत पोहोचवले तसेच पहिलाच गोल करून आपल्या संघाला खेळ प्रदर्शन चांगल्या रीतीने करत असताना त्याच कामगिरीच्या बदल्यात त्या दोघींची महाराष्ट्र रग्बी निवड चाचणी सरावासाठी निवड झाली होती.
त्या सदरील महाराष्ट्र निवड प्रशिक्षण शिबिर दि.१६ ते १९ डिसेंबर २०२२ दरम्यान नंदुरबार जिल्हा येथे चालू असताना त्यामध्ये महाराष्ट्र भरातून आलेल्या खेळाडूंमध्ये नांदेड जिल्ह्यातील (केंद्रीय विद्यालय एस सी आर नांदेड) कु.आदिती प्रवीणराव बोरकर, (विमल इंग्लिश स्कूल भोकर) कु.किंजल गोविंद थोरात या दोन खेळाडू मुलींची रग्बी फुटबॉल महाराष्ट्र संघात निवड झाली असून दि. २१ ते २३ डिसेंबर २०२२ रोजी अहमदाबाद, गुजरात राज्य येथे होणाऱ्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत भारतभरातून आलेल्या सर्व संघासोबत या दोन मुली आपल्या संघासोबत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे या यशाबद्दल सार्वत्रिक त्या दोघींचे कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्र संघात स्थान मिळवल्याबद्दल नांदेड जिल्हा रग्बी संघटनेचे महासचिव प्रलोभ कुलकर्णी, संघटनेचे राजे खंडेराव देशमुख पळशीकर,कासलीवाल, ॲड.निलेश पावडे पदाधिकारी, भोकर तालुक्यातील पत्रकार, उत्तम जी बाबळे , सदान्शु कांबळे, पत्रकार पडोळे,डॉ.बळीराम लाड, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार,किशोर पाठक,महेंद्र कुंडगुलवार, लक्ष्मण फुलारी,शेख शब्बीर, गजानन पाटील कल्याणकर ,अमृत जाधव,संतोष आणेराव,संतोष सोनसळे, आदी मान्यवर यांनी खेळाडूचे अभिनंदन केले तसेच या खेळाचे मुख्य क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू नियमित प्रशिक्षण घेत होते.
त्या प्रशिक्षणाचा या खेळाडूंना फायदा झाला म्हणून ते खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचले त्याबद्दल प्रशिक्षक तसेच त्या खेळाडूंचे सार्वत्रिक कौतुक केले जात आहे इतर सर्व रग्बी खेळाडू तसेच सीनियर रग्बी खेळाडू कु.पार्वती चव्हाण, कु.राणी जाधव , तसेच स्वर्गीय राज्यस्तरीय उत्कृष्ट रग्बी खेळाडू सुमित विनोद सुरदसे याच्या प्रेरणेतून रग्बी या खेळाला प्रेरणादायी वळण मिळाले आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत लागलेल्या या दोन शाळकरी मुलींना सर्व खेळाडू, पदाधिकारी, हितचिंतक या सर्वांनी राष्ट्रीय रग्बी संघात निवड झाल्या बद्दल अभिनंदन केले व पुढील राष्ट्रीय रग्बी क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आले आहे.