नायगांव, रामप्रसाद चन्नावार। एज्युकेशन सोसायटी नायगांव बा.संचलीत लिटल स्टेप इंग्लिश स्कुल नायगांव च्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धेत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पातळीवर उत्तुंग कामगिरी करत तालुका व जिल्हा स्तरावर 17 वर्षाखालील मुली या गटात बॅडमिंटन या खेळात विभागीयस्तर गाठले.
त्याच बरोबर 17 वर्षा खालील मुलींच्या संघांनी खो-खो या क्रीडा प्रकारात चुरशीच्या सामन्यात द्वितीय क्रमांक पटकावला याच गटात 100×4 रिले प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून शालेय स्तरावर विजय संपादन केला या विजयाबद्दल विभागीय स्तरावर विजय संपादन करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्व खेळाडू आणि त्यांचे मार्गदर्शक श्री जे.एन. ठाकूर सर व श्री बालाजी शिंदे सर यांचे संस्थेचे अध्यक्ष मा श्री वसंतराव चव्हाण साहेब, सचिव श्री रवींद्र पा. चव्हाण, समन्वयक श्री के.यु.गारटे व संपूर्ण शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.