
श्री क्षेत्र माळेगाव| उत्तम जागा पाहुणे मल्हारी देव नांदे गड जेजुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत बेल भंडाऱ्याची उधळण करीत पारंपरिक पद्धतीने यंदाच्या माळेगावच्या श्री खंडोबारायाच्या यात्रेस शुभारंभ झाला आहे.

यावेळी प्रारंभी जिल्हाधिकारी मा.श्री अभिजीत राऊत यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी आमदार मा.श्री. शामसुंदर शिंदे पाटील, श्रीमती आशाताई श्यामसुंदर शिंदे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. संदीप माळोदे, प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक मा. डॉ.श्री. संजय तुबाकले, जिल्हा परिषदेचे खाते प्रमुखांची उपस्थिती होती. त्यानंतर दुपारी पालखी पूजन नंतर देव स्वारी काढण्यात आली.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड आयोजित महिला स्वयं सहायता समूहाने बनविलेल्या उत्पादनाचे स्टॉलचे उद्घाटन आमदार मा.श्री. श्यामसुंदर शिंदे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. संदीप माळोदे,प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक मा. डॉ. श्री. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती मंजुषा जाधव -कापसे, जिल्हा कार्यक्रमाधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनरेगा मा.श्री. व्ही आर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती रेखा कदम-काळम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन मा.डॉ.श्री. सुधीर ठोंबरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक मा. श्री गजानन पातेवार, जिल्हा व्यवस्थापक श्री. द्वारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक श्री. माधव भिसे, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य विक्री प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी जिथे दिव्यत्वाची प्रचिती तिथे कर आमचे जुळती या उक्तीप्रमाणे राजमाता राष्ट्रमाता माँ. जिजाऊ आईसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमास प्रारंभ झाला.

नांदेड जिल्ह्यातील एकूण २० महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य विक्री प्रदर्शन स्टॉल लावण्यात आलेली होती. त्यामध्ये पापड, मसाला, लोणचे, लघुउद्योग झुणका भाकर पिठलं, खारोडी, दही धपाटा, शेवया, मसाला, मिरची पावडर, हळद, पारंपारिक पद्धतीने बनवलेले झाडू ,विणकाम ,सर्वात जास्त आकर्षण म्हणजे कुंटूर येथील महालक्ष्मी व गिरजामाय महिला स्वयंसहायता समूहांनी बनवलेल्या मेंढीच्या केसापासून बनवलेली घोंगडी स्टॉलमध्ये मुख्य आकर्षण ठरले व विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली विणकाम हातमाग शोभेच्या वस्तू, प्रकाश दिवे, बिबा गोडंबी, विणकाम पायपुसणी आसनपट्टी, रान तरोट्याची चहापत्ती, शेवग्याच्या पानाचे पापड, अशा विविध वस्तूंचे विक्री स्टॉल उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या भव्य विक्री प्रदर्शन सोहळ्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड च्या माध्यमातून विविध कमिट्या गटित करून लोकांच्या सेवेसाठी महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे.

या भव्य विक्री प्रदर्शन सोहळ्यात शासनाच्या विविध योजना त्याची उपयुक्तता या विषयी माहिती तालुका व्यवस्थापक श्री. इरवंत सूर्यकार यांनी उपस्थिताना करून दिली. जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षा कडून कर्मचारी श्रीमती कांता ताटे, श्रीमती लक्ष्मी मरेवार, श्रीमती राधा मिरदोडे तालुका अभियान व्यवस्थापक गंगाधर राऊत, शिवशंकर चिलगर, प्रभाग समन्वयक हनुमंत कंदुरके, आतिश गायकवाड, कार्यालयीन सहाय्यक बालाजी जोगदंड स्किल को-ऑर्डिनेटर दत्ता टेकाळे,बालाजी गिरी आदींची उपस्थिती होती…

