Monday, February 6, 2023
Home Uncategorized औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदान केंद्राची प्रारुप यादी 24 डिसेंबर रोजी प्रसिद्ध -NNL

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदान केंद्राची प्रारुप यादी 24 डिसेंबर रोजी प्रसिद्ध -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| राज्यसभा आणि राज्य विधानपरिषदेसाठीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्तपुस्तिकेतील प्रकरण 2 परिच्छेद 14.1 मधील निर्देशानुसार 5-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक 2023 साठी मतदान केंद्राची प्रारुप यादी शनिवार 24 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ही यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी तसेच सर्व तहसिलदार यांचे कार्यालयात मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदरची प्रारुप यादी नांदेड जिल्ह्याचे संकेतस्थळ https://nanded.gov.in यावर देखील मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

मतदान केंद्राच्या प्रारुप यादी संबंधाने हरकती व सूचना ही यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसापर्यंत म्हणजेच शुक्रवार 30 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांच्याकडे सादर करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!