Thursday, February 2, 2023
Home Uncategorized लुटीच्या तंत्रातून बचावासाठी ग्राहकांना जागृत होण्याची गरज -NNL

लुटीच्या तंत्रातून बचावासाठी ग्राहकांना जागृत होण्याची गरज -NNL

by nandednewslive
0 comment

आज 24 डिसेंबर; राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त हा प्रपंच. ग्राहकाने कोणतीही सेवा असो वा वस्तू खरेदी असो याबाबत जागृत असणे आवश्यक आहे. आजच्या परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी ग्राहकांची आर्थिक लूट करण्यासाठी नवनवीन तंत्राचा वापर करून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढतच चालले आहे. रोजची वस्तू खरेदी असो की ऑनलाईन वस्तू मागविणे, याबरोबरच बँकेचे व्यवहार करताना व्यवस्थित माहिती घेऊनच केले तर लुटीच्या तंत्रातून ग्राहक स्वतःचा नक्कीच बचाव करून घेऊ शकतो.

बँक व्यवहारात ओटीपीला अनन्य महत्त्व आहे. हा ओटीपी चुकूनही कोणास शेअर करू नये अन्यथा ग्राहकाचे खाते रिकामे होण्यास वेळ लागणार नाही. याबाबत बँक ग्राहकांना एसएमएसद्वारे सूचना देत असते परंतु कोणत्याही कारणाने बँक खात्यातील रकम गायब झाली असेल तर तात्काळ नॅशनल सायबर क्राईमच्या हेल्पलाईन क्र. 1930 सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तक्रार करावी किंवा असे वारंवार होत असेल तर संबंधित बँकेकडे लेखी तक्रार द्यावी व तेथेही यथायोग्य समाधान न झाल्यास रिझर्व बँकेच्या 14448 (यावर सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.15 पर्यंत) किंवा 14440 (तक्रारीसाठी मिसकाॅल देता येतो) किंवा अधिक मदतीसाठी 86919 60000, 011-2332 5225 (नवी दिल्ली मुख्य कार्यालय) 022-2270 4715 (मुंबई विभागीय कार्यालय)अथवा crpc@rbi.org.in येथे आपली तक्रार दाखल करावी, आपणास न्याय मिळेल, हे नक्की.

वस्तु खरेदी करताना त्याचे वजन, पॅकिंग केंव्हा केलेली व कधीपर्यंत ही वस्तू वापरण्यास योग्य आहे. किंवा वस्तु सदोष असेल तर तक्रारीचा नंबर दिला आहे का याची सखोल माहिती घेणे आवश्यक आहे अन्यथा बर्‍याचवेळी वजनात कमी, पॅकिंग केलेल्या वस्तू फुटल्या असतील किंवा पॅकिंग एक्स्पायर झाल्या नसल्याची खात्री करूनच घ्याव्यात. तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त रक्कम घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. शिवाय वस्तुच्या खरेदीची रितसर पावती घ्यावी, बर्‍याचवेळी व्यापारी इस्टीमेटवर पावती देतात. या पावतीला कायदेशीर अस्तित्व नसल्याने ग्राहकाची फसवणूक होत असते. यावर ग्राहकांनीच अंकुश ठेवला तरच फसवणूक होणार नाही.

एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर ती चुकीची किंवा खराब असेल तर ती वस्तू संंबंधित व्यापार्‍याकडून वस्तू बदलून घेणे अथवा वस्तू न पटल्यास रक्कम परत घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. परंतु हा व्यवहार करताना कायद्याने वैध ठरणारीच पावती ग्राहकाने व्यापार्‍याकडून घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे ग्राहक आयोगाकडून न्याय मिळू शकतो अन्यथा फसवणूक होते ही बाब ग्राहकाने लक्षात घेतली पाहिजे.

banner

बर्‍याच सेवा घेताना ग्राहक जागृत नसेल तर त्या सेवा निकृष्ट दर्जाच्या व कधीकधी तर सेवा देण्यासाठी टाळाटाळ केल्या जाते. या सेवा ग्राहकांसाठी गरजेच्या असल्याने याबाबत काहीही त्रुटी जाणवल्यास त्याबाबत संबंधितांकडे तक्रार करावी म्हणजे न्याय मिळण्यास सुलभ होईल.

सर्व सरकारी सेवा त्यात होणारी दिरंगाई व त्यामुळे होणारे नुकसान याबाबत संबंधित अधिकार्‍याकडे तक्रार करावी किंवा आपले सरकार या शासकीय पोर्टलवर किंवा संबंधित खात्याच्या वेबसाईटवर तक्रार करावी. जेणे करून तुमचे गार्‍हाणे सोडवण्यासाठी वरिष्ठस्तरावरील अधिकारी मदत करू शकतील.

प्रवासात येणारी अडचण व मिळणार्‍या सेवेत त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकार्‍याकडे तक्रार नोंदवावी. बसस्थानकातील सेवेची त्रुटी असेल तर बसस्थानक व्यवस्थापकाशी संपर्क साधून तक्रार द्यावी किंवा परिवहन महामंडळाच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी तर त्याची दखल घेतली जाऊन न्याय मिळू शकतो.

बर्‍याचवेळा ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्तीचे प्रवासभाडे घेणे, प्रवासात जास्तीच्या दराने वस्तूची विक्री होत असल्यास संबंधित विभागाच्या अधिकार्‍याकडे तक्रार दाखल करावी किंवा खासगी वाहन असेल तर परिवहन विभागाच्या वेबसाईटवर तक्रार दाखल करावी या शिवाय ग्राहकांना कोणतीही तक्रारबाबत मार्गदर्शन हवे असल्यास ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या 9205470460 या नंबरवर संपर्क साधता येईल.

वेळोवेळी ग्राहकाने तक्रार करून वस्तू व सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी सजग राहिले तरच आजच्या जगात ग्राहकाची आर्थिक लूट थांबेल अन्यथा पदोपदी होणारी आर्थिक लूट करणार्‍या शक्ती आहेत, नामी शक्कल लावून ग्राहकांना आर्थिक लुटीपासून संरक्षण देण्यासाठी वेळोवेळी ग्राहक संरक्षण कायदा 1986 बाबत माहिती करून घेणे ही जवाबदारी ख-या अर्थाने प्रत्येक नागरिकाची आहे तर खर्‍या अर्थाने 24 डिसेंबर; राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला तरच ग्राहक सुरक्षित होईल.

….रमाकांत घोणसीकर, कोषाध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र नांदेड, सहसचिव, विश्वासू प्रवासी संघटना, नांदेड.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!