
उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन तर सम्राट अशोक प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थ्यानीचा तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या वकृत्व व निबंध स्पर्धेत घवघवीत सुयश मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थीनीचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राउत व जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार जिल्ह्यात विर बाल दिवस दिनानिमित्त वकृत्व व निबंध स्पर्धा केद्र स्तरांवर,व तालुका स्तरावर घेण्याचे आदेश दिले होते.तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी बालाजी शिंदे ,शिक्षण विस्तार अधिकारी मेटकर , केंद प्रमुख जयवंतराव काळे,यांच्या मार्गदर्शनाखाली लहान व मोठ्या गटाची विभागणी करून सदरील स्पर्धेचे आयोजन केले होते.यामध्ये इ. ५ वी ते ८ वी. आणि इ.९ वी ते १२ वी असे दोन गटाची विभागणी केली होती.या स्पर्धैमध्ये तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

निबंध स्पर्धेत ५ वी ते ८ वी आणि ९ व १२ वी गटातून प्रथम रंजना राजेंद्र रायवाडे इ. ८ वी ( जि.प. प्रा.शाळा नारनाळी ) व्दितीय सानिका राजेश शिंदे इ. ७ वा ( जि.प.प्रा.शाळा दाताळा ) ,प्रथम ऐश्वर्या नामदेव घोरबांड इ. ९ वा. ( समता विद्यालय उस्माननगर ) ,व्दितीय श्रुती जनार्दन जाधव इ. १० वा ( स्व. राजीव गांधी विद्यालय बोळका ) यांची तर दुसऱ्या गटातील वकृत्व स्पर्धेत ५ वी ते ८ वी आणि ९ वी १२ वी या गटातून प्रथम शेख तैसिम नय्युम शेख इ.८ वी ( सम्राट अशोक प्राथमिक शाळा उस्माननगर ) व्दितीय प्रतीक्षा संग्राम मुसळे इ.७ वा ( श्री.शिवाजी विद्यालय कंधार )

प्रथम सानिका रविराज लोखंडे इ.११ वी. ( समता विद्यालय उस्माननगर) व्दितीय ऐश्वर्या नामदेव घोरबांड इ. ९ वा ( समता विद्यालय उस्माननगर ) यांनी आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरावरील वकृत्व व निबंध स्पर्धेत सुयश मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने सभागृहात सत्कार करण्यात आला.यावेळी गणेश लोखंडे, माणिक भिसे ,प्रदीप देशमुख ,लक्ष्मण कांबळे , मुख्याध्यापक तथा मा उपसरपंच राहुल सोनसळे शेख शकील यांच्या सह अनेकांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

