वाळकेवाडी/हिमायतनगर,शंकर बरडे| एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत येणारी शासकीय माध्यमिक व उच्चं माध्यमिक आश्रम शाळा दुधड ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील १७ वर्षे वयोगटातील मुलांनी जिल्हास्तरीय कब्बड्डीच्या स्पर्धेत दणदणित विजय मिळवून विभागीय स्पर्धेत आपले स्थान कायम ठेवले आहेत.
तालुकास्तरीय कब्बड्डीच्या स्पर्धेत विजय प्राप्त करून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आपली जागा निश्चित केली होती. आणि आता जिल्हास्तरीय कबड्डीच्या स्पर्धेत अंतिम सामन्याची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती, हिमायतनगर तालुका आणि किनवट तालुका हे दोन्ही मातब्बर संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले होते. या सामन्याची सुरुवात चांगलीच रंगतदार झाली. कारण दोन्ही संघांची यावेळी आक्रमक खेळी पाहायला मिळाली.
या सामन्याच्या पहिल्या सात मिनिटांमध्ये हिमायतनगर या संघांची ३-९ अशी आघाडी पाहायला मिळाली. त्यानतर सुद्धा या सामन्यात आश्रम शाळा दुधड, ता.हिमायतनगर संघाने चांगलीच पकड जमवल्याचे पाहायला मिळाले. हिमायतनगर संघाने यावेळी चांगल्या पकडीही केल्या आणि त्याचा फायदा त्यांना मिळाल्याचे दिसले. सामन्याच्या १४व्या मिनिटाला हिमायतनगर तालुका संघाकडे ६-१९ अशी दमदार आघाडी असल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी हिमायतनगर संघ किनवटपेक्षा १३ गुणांनी आघाडीवर होता. त्यानंतर हिमायतनगर संघाने सावध पवित्रा घेतला खरा, पण त्यांनी आघाडी वाढवण्यावर आपला भर कायम ठेवला. किनवट संघाच्या चढायांमध्ये जास्त गुण न देण्याची हिमायतनगर संघाची रणनिती यावेळी यशस्वी ठरत असल्याचे पाहायला मिळाले. पण दुसरीकडे यावेळी किनवट संघाला चांगल्या पकडी करता आल्या नाही आणि याच गोष्टीमुळे त्यांना हिमायतनगर संघावर आघाडी मिळवता येत नव्हती.
कर्णधार शिवाप्रसाद बुरकुले हे त्यांच्या काही शारीरिक अडचणीमुळे सामना खेळू शकले नाही पण यावेळी त्यांनी संघाची चांगली रणनिती आखली होती. या संघात आक्रमणाची जबाबदारी राहुल भुरके व शाम मेश्रामकडे दिली होती. प्रवीण व राहुलने यावेळी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केल्याचे पाहायला मिळाले. कारण राहुल व शाम यावेळी आपल्या चढायांमध्ये सर्वाधिक गुण आपल्या संघाला मिळवून दिल्याचे पाहायला मिळाले. कठोर परिश्रम घेणारे क्रीडा शिक्षक, सोनटक्के सर, मुलांना मोलाचे मार्गदर्शन प्रेरणा देणारे प्राचार्य प्रल्हाद चामे सर,सहकार्य करणारे चव्हाण सर व त्यांचे सहकारी शिक्षक या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मुलांनी यशाचा शिखर गाठले आहे.