
नांदेड। भाजपा महानगर नांदेडतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ” बहना भाग मत जाना ” या युवती संस्कार शिबिराचे उद्घाटन रविवार दि.२५ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ठीक १ वाजता एनएसबी कॉलेज नांदेड येथे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. सोनिया उमरेकर यांच्या हस्ते होणार असून वेळेवर उपस्थित राहणाऱ्या सर्व मुली व महिलांना क्यूटीस बायोटेकतर्फे तीनशे रुपयाची आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली.

अकराव्या वर्षी होणाऱ्या या शिबिराला सुप्रसिद्ध व्याख्याते व लाखो तरुणांचे श्रद्धास्थान असलेले सोपानदादा कनेरकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. आपल्या व्याख्यानातून खळखळून हसवतांना काही वेळा श्रोत्यांच्या डोळ्यातून पाणी आणण्याचे सामर्थ त्यांच्या वाणीत असल्यामुळे समाज माध्यमात हजारो फॉलोवर्स सोपानदादांचे आहेत. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली देशमुख राहणार आहेत.विशेष अतिथी म्हणून राजपुत महिला प्रदेशाध्यक्षा सुषमा ठाकूर,भारतीय स्त्रीशक्ती महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्षा सुरेखा किनगावकर,जैन स्नातक मंडळ माजी अध्यक्षा चंदना भंडारी ह्या राहणार आहेत.

याशिवाय जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ. विद्या पाटील,ब्राह्मण महासंघ महिला जिल्हाध्यक्षा प्रीती वडवळकर, माहेश्वरी महिला जिल्हाध्यक्षा गिता झंवर, श्री गुरुगोविंदसिंघजी अध्यासन केंद्र सल्लागार सदस्या डाॅ.परविंदरकौर महाजन, विश्व सिंधी सेवा संगम महिला जिल्हाध्यक्षा लाजवंती प्रेमचंदानी, क्यूटीस बायोटेक संचालिका अर्चना काबरा,वासवी क्लब महिला प्रदेशाध्यक्षा सुनिता वट्टमवार,मराठवाडा पद्मशाली महिला संघटना कार्याध्यक्षा माधवी गुम्मलवार, अग्रवाल समाज महिला जिल्हा कोषाध्यक्षा प्रणिता गुप्ता,भारतीय जैन संघटना महिला जिल्हाध्यक्षा सुचिता उकलकर, राजस्थानी महिला जिल्हा सचिव सारिका मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या दोन भाग्यवान मुलींना तीन महिन्याचा टॅली काम्प्युटर कोर्स आणि दुसऱ्या दोन मुलींना भडके कॉम्प्युटर्स तर्फे तीन महिन्याचा एमएससीआयटी कम्प्युटर कोर्स मोफत करता येणार आहे. या शिबिरामध्ये यापूर्वी ज्या तरुणी लव्ह जिहादच्या दुष्चक्रातून गेलेल्या आहेत त्या आपली आपबिती कथन करणार आहेत. त्यामुळे आपल्या परिवारातील मुलींवर अविश्वास नाही तर त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे या उद्देशाने या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. सभागृहात जागा मर्यादित असल्यामुळे फक्त मुली, तरुणी व महिला यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मुलींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा नांदेड जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

