श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा, मिलिंद व्यवहारे। दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेत वीविध राज्यात तून लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येत असतात. या भाविकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध लाभाच्या योजनांची माहिती होण्यासाठी माळेगाव येथे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे स्टाँल येथे उभारण्यात आली आहेत. या स्टाँलला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पाणी व स्वच्छता प्रदर्शनी – माळेगाव यात्रेत नागरिकांना स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची माहितीचे संदेश देण्यासाठी परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने स्वच्छता प्रदर्शनी उभारण्यात आली आहे. या स्वच्छता प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वच्छता प्रदर्शनीमध्ये घनकचऱ्याचे व्यवस्थापन करताना घरगुती खत खड्डा, जमिनीतील बांधील खतखड्डा, नाडेप खत खड्डा, गांडुळ खत, बायोगॅस प्लॅन्ट, वैयक्तिक व सार्वजनिक सांडपाणी जमिनीत मुरवण्यासाठी शौषखड्डा, पाझरखड्डा, पारसबाग, तसेच सार्वजनिक पाझरखड्डा, सांडपाणी स्थिरीकरण तळे यांची माहिती मांडण्यात आली आहे. प्लॉस्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे, पर्यावरण समतोल राखण्यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची नितांत गरज असल्याचे या प्रदर्शनातून नागरिकांना संदेश जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, हदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमेश मुदखेडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी अलकेश शिरशेटवार, स्वच्छता तज्ञ विशाल कदम, समाज शास्त्रज्ञ महेंद्र वाठोरे, कृष्णा गोपीवार, गट समन्वयक बुध्दरत्न गोवंदे, अंसाराम शिंदे, दत्तात्रय इंदूरकर, लक्ष्मीकांत टाकळकर आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रदर्शनाविषयी आमदार श्यामसुंदर शिंदे आणि मान्यवरांना माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार डॉ नंदलाल लोकडे यांनी माहिती दिली.
माळेगाव यात्रेत भव्य पशु प्रदर्शन – श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा, मिडिया सेंटर, मिलिंद व्यवहारे,23- माळेगाव यात्रेत पशु प्रदर्शनात विविध कुंत्र्यांच्या जातीमध्ये राँट, ब्रिलर, लाँबर डॉग आदी कुत्र्यांच्या जातींनी हजेरी लावली. विविध पशूमध्ये घोडे, गाढव, उंट, कोंबडे तसेच विविध जातीचे कुत्रे पहावयास मिळाले.
विविध जातींचे अश्व – घोडे बाजार हे माळेगाव यात्रेचे आकार्षण आहे. येथे विविध जातीचे अश्व दाखल झाले आहेत. यावेळी अश्व प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोधनकर, डॉ. अरविंद गायकवाड, गट विकास अधिकारी वाव्हळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, नंदलाल लोकडे, शिवाजी टोंपे आदींची उपस्थिती होती. यात्रेत यावेळी सिंध, काठेवाड, धारवाड, पंजाब, नुकरा, स्टँलिकन, बाँडा, हुलकारी, पंचकल्याण आदी जातीचे अश्व दाखल आहेत. यावेळी अश्वांच्या विविव कवायती प्रेक्षकांना दाखविल्या.