Saturday, January 28, 2023
Home Uncategorized राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य शहरी व ग्रामीण भागात वाढले पाहिजे – माजी केंद्रीय मंत्री गायकवाड -NNL

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य शहरी व ग्रामीण भागात वाढले पाहिजे – माजी केंद्रीय मंत्री गायकवाड -NNL

by nandednewslive
0 comment

नविन नांदेड। नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी पक्षासाठी एकनिष्ठ कामकरावे व विविध योजना व राष्ट्रवादीचे पक्षाचे कार्य ग्रामस्थ व नागरीकां पर्यंत पोहचुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्राबल्य वाढवावे यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मथंन वेध भविष्याचा विचार राष्ट्रवादीचा अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड शहर आयोजित एक दिवसीय पदाधिकारी कार्यकर्ता शिबीराचे आयोजन हाटेल रूबी एम.आय.डी.सी सिडको नांदेड येथे २४ डिसेंबर रोजी करण्यात आले होते.

कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी नांदेड शहर अध्यक्ष डॉ.सुनिल कदम तर उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, यांनी केले यावेळी हिंगोली चे वक्ता सेलचे अध्यक्ष वक्ते राजा कदम,मकबुल सलीम, भगवानराव आलेगावकर,देवराव टिपरसे, गोविंद यादव,माठोरे, प्रा.जांभरूनकर,यांच्या सह नांदेड दक्षिण विधानसभा राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष गंगाधर कवाळे,माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, गणेश तांदलापुरकर,प्रा.एकनाथ वाघमारे,दता पाटील तळणीकर, बंटी लांडगे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राहुल जाधव, कल्पना ताई डोगंळीकर, विलास गजभारे, सरफराज अहेमद,शफी ऊर रहेमान,यनुस खान,रऊफ जमीनदार, धनंजय सुर्यवंशी,शिवराज घोरपडे, नारायण भालके, मारोती चिवळीकर, संजय पाटील, मोहमदी पटेल, कन्हैया कदम, पांडुरंग काकडे, योगेश भरकड,यांच्या सह ऊतर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गजानन वाघ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्यी ,अठरा पगड जातीची व सर्व धर्म समावेशक पार्टी म्हणजे राष्ट्रवादी होय असल्याचे सांगून नेता शरद पवार हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व असुन साठ वर्षांच्या अनुभव असलेला मोठा नेता असल्याचे उल्लेख शरद पवार यांच्या आहे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली, तर प्रवक्ते राजा कदम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून जिल्ह्यात व शहरी ग्रामीण भागात पक्षासाठी सदैव कार्य करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले,व राष्ट्रवादी ध्येय धोरणे व माहिती दिली तर कार्यकर्त्यांनी कामाला लागुन कार्यकर्त्यांची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन केले.

शिबीराचे सुत्रसंचलन सय्यद मौला साब,आभार गंगाधर कवाळे यांनी केले,या शिबीराला नांदेड उत्तर,दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोहळा व नियुक्ती पत्र्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!