Tuesday, February 7, 2023
Home Uncategorized लोहयात आ हंबर्डे यांच्या गाडीला अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसला धडक -NNL

लोहयात आ हंबर्डे यांच्या गाडीला अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसला धडक -NNL

by nandednewslive
0 comment
लोहा। लोहा शहर व तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली असुन जादा ट्रिप मारण्याच्या धांदात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बस व काळीपिवळी टॅक्सीवाले भरधाव वेगात गाड्या चालवितात त्याच परिणामअपघातांच्या  प्रमाण वाढ झाली आहे.
शहरातील मुख्य चौकात आ मोहन अण्णा हंबर्डे यांची गाडी थांबली असता कंधारकडे जाणाऱ्या अवैध प्रवाशी ट्रॅव्हल्सने त्यांच्या वाहनास धक्का दिला यात कोणतीही जीवित हानी झाली नाही या घटनेत ट्रॅव्हल्स चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोह्याच्या छत्रपती शिवाजी महाराज  चौकात काही जणांनी दुकानाच्या समोर खडक टाकून रस्ता अडथळा निर्माण केला जातोय त्याकडे कर्तव्य तत्पर नगर पालिकेचे लक्ष नाही शिवाय कंधार कडे जाणार सिमेंट रस्ता  बनविला जातोय त्यामुळे चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते रात्री तर मोठ्या ट्रॅव्हल्स मुळे मोठी वाहतूक समस्या बनली आहे.
आ.मोहन अण्णा हंबर्डे यांची इंनिवा गाडी( क्रमांक एमएच २६ सीडी ०९०९ )ही थांबलेली असताना नांदेडहून कंधारकडे अवैध प्रवासी प्रवासी करणाऱ्या खाजगी बस क्रमांक एमएच १४ बीए ९५७४ या खाजगी बसच्या चालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे गाडी चालवून जोरदार धडक दिली असल्याने गाडीचे इंडीकेटर फुटुन मागचा भाग दबला गेला सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. आ. मोहन अण्णा हंबर्डे यांचे पुतणे नरसिंग धारोजीराव हंबर्डे हे लोहा येथील सोनी साडी सेंटर येथून कपडे खरेदी करून लातूरकडे  नातेवाईकांकडे जात असताना सदरील  घटना शुक्रवारी सकाळी घडली. लोहा पोलिसांनी सदरील प्रकरणी खाजगी बस चालकास ताब्यात घेतले व गुन्हा नोंदविला.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!