नांदेड। दि. 17 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा विभागातर्फे सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड येथे विभाग स्तरीय शालेय जलतरण स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
चौदा, सतरा व एकोनिस वर्षाखालील मुलामुलींच्या तीन गटातील जलतरणाच्या विविध प्रकारात नांदेड, लातुर व उस्माणाबाद जिल्हयातील अनेक स्पधर्कांनी आपआपल्या जिल्ह्यामार्फत सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटात गुजराती माध्यमिक शाळा, नांदेडची विदयार्थीनी कु.अनन्या आनंद देशमुख, इयत्ता आठवी हीने नांदेड जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करत जलतरणाच्या ब्रेस्ट स्ट्रोक 50 मिटर प्रकारात विभागात प्रथम स्थान मिळवले व पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धसाठी तीची निवड झाली. तसेच 400 मिटर फ्रि प्रकारात अनन्याने विभागात तिसरे स्थान मिळवुन यश संपादन केले.
तिच्या यशात नांदेडचे जलतरण प्रशिक्षक राजेश सोनकांबळे व मयुर केंद्रे यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच गुरुवर्य बापु किनगावकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले आहे. कोव्हीड कालावधीत जलतरण शिकल्यापासुन अल्पावधीतच मिळवलेल्या या यशाबददल गुजराती शाळेचे मुख्याध्यापक सुमठाणकर, क्रिडाशिक्षिका सौ.सिमाताई जोशी, तसेच शाळेतील शिक्षकवर्ग, विद्यार्थी व गोदावरी स्विमिंग ग्रुप नांदेड यांच्याकडुन तिचे अभिनंदन होत आहे व पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता तिला शुभेच्छा दिल्या आहेत.