Thursday, February 2, 2023
Home Uncategorized आज पारंपारिक लोककला महोत्सव; विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण व समारोप -NNL

आज पारंपारिक लोककला महोत्सव; विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण व समारोप -NNL

by nandednewslive
0 comment

श्रीक्षेत्र माळेगाव मीडिया सेंटर, मिलिंद व्यवहारे। दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा पारंपारिक लोककलेसाठी प्रसिद्ध आहे. आज सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी माळेगाव यात्रेमध्ये पारंपारिक लोककला महोत्सव होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार शामसुंदर शिंदे पाटील, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे. नरेगाचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक व्‍ही.आर. पाटील, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी 4 वाजता यात्रेतील विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि समारोप कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी विशेष अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव, कार्यकारी अभियंता बांधकाम एस.जी. गंगथडे, सागर तायडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, गट विकास अधिकारी शैलेंद्र वाव्‍हळे, ए.एन. मांजरमकर, मिथुन नागमवाड, राजकुमार मुक्कावार, एस.ए. धन्‍वे, विठ्ठल सुरोसे, एस.जी. कांबळे, मयूर अंदेलवाड, अमित राठोड, एस.एच. बळदे, एम.डी. जाधव,एस.यु. देशमुख, आर.एस. बजाज व एल.आर. वाजे यांची उपस्थिती राहणार आहे.

उबदार कपड्यांची बाजारपेठ फुलली

banner

माळेगावच्या प्रसिद्ध यात्रेत उबदार कपड्यांच्या बाजार फुलला आहे. थंडीपासून बचाव करणारे स्वेटर, जॅकेट, कान टोपी, हातमोजे, पायमोजे, शाल, चादरी, बनारसी शाल, सतरंजी, रग, घोंगडी, लोकरीचे कपडे या सर्व वस्तूंची दुकाने यात्रेत थाटण्यात आली असून नांदेड रोड, लातूर रोड, जुना वळण रस्ता, पोलीस चौकी रस्ता, घोडा मार्केट, विश्रामगृह परिसर या सर्व ठिकाणी ही बाजारपेठ फुलली आहे. माळेगाव यात्रेत इतर कोणत्याही वस्तूंच्या दुकानापेक्षा उबदार कपड्यांचे दुकाने खूप आहेत.

तसेच या लोकरी कपड्यांच्या बाजारात मिळणाऱ्या कपड्यांच्या किमती या रिटेलच्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या कापडांच्या तुलनेत फारच कमी आहेत. म्हणून हिवाळ्यातील थंडीपासून बचावासाठी मोठ्या संख्येने नागरिक या दुकानावर गर्दी करताना दिसत आहेत. ही दुकाने यात्रा संपल्यावर सात ते आठ दिवस इथेच राहतात. सदर दुकानाचे व्यापारी उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यातून आलेली आहे. काळ्या व पांढऱ्या घोड्यांनाही मोठ्या प्रमाणात येथे मागणी आहे.

बालकांच्या खेळणीची बाजारात गर्दी – माळेगावच्या यात्रेमध्ये लहान मुलांची व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लहान मुलांची खेळणी मोठ्या प्रमाणात आली आहे. त्यावर लहान मुले मौज घेण्यामध्ये मग्न दिसत आहेत. त्या खेळणी मध्ये लहान झोके, आगगाडी, मोटारी, आकाश पाळणा ही साधने आली आहेत.

तसेच तांबडा, लाल, गुलाबी, पिवळा विविध रंगाचे कुंकू बाजारात आले आहेत. येथे हरमाल जोर धरला आहे. त्यामध्ये बांगडी, पॉकेट, बेल्ट, टिकल्या, पीना, झुमके, नथनी, पायातली चैन, बो, गळ्यातले हार, नेकलेस, कंबर पट्टा, बाजू बंध, साडी पीन, लिपिस्टिक, मेकअप बॉक्स, नेलपेंट आणि शोभेच्या नवनवीन वस्तू विक्रीसाठी आले आहेत. हारमाल 20, 30, 40 रुपयाप्रमाणे विक्रीचे मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहेत. या वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेमध्ये महिलांची गर्दी होत आहे.

यात्रेत ताडपत्री कार्पेटच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल – दक्षिण भारतात विविध व्यवसायाचे व्यापारी माळेगाव यात्रेत येत असतात. या यात्रेत ताडपत्री व कार्पेट बाजार फुलला असून या खरेदी विक्रीसाठी व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेत गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र आदी राज्यातून ताडपत्री व कार्पेट या व्यवसायाचे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आले असून त्यांनी यात्रेत आपली दुकाने थाटली आहेत. या यात्रेत केवळ ताडपत्री व कार्पेट खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांसह विविध यात्रेकरूंनी गर्दी केली आहे. ताडपत्री व कार्पेट जवळपास 500 ते 800 रुपये मीटर प्रमाणे विक्री होत असल्याने या यात्रेत ताडपत्री व कार्पेट व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.

भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी माळेगाव यात्रेत येऊन श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी संजीवनी गाडे, शंकर ढगे, आनंदराव पाटील, बंडू वडजे, रंगराव पाटील, केरबा पाटील, रोहित पाटील सतीश पाटील, अविनाश पाटील आदींची उपस्थिती होती. प्रणिताताई देवरे यांनी माळेगाव यात्रेत फिरून खरेदी केली. विविध राहुटींना भेट दिली.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!