Thursday, February 2, 2023
Home Uncategorized खा. चिखलीकर येताच प्रशासन गतीमान ; फिरते शौचालय-स्नानगृह तात्काळ उभारण्याचे निर्देश -NNL

खा. चिखलीकर येताच प्रशासन गतीमान ; फिरते शौचालय-स्नानगृह तात्काळ उभारण्याचे निर्देश -NNL

समस्यांचा आढावा.... मानकरी निवासस्थानाचे उद्घाटन

by nandednewslive
0 comment

माळेगाव यात्रा| माळेगाव यात्रा नियोजन नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांच्या हाती गेले आणि त्याची तारांबळ उडाली. यात्रापुर्व काळात निधी दिला नाही आणि कामांना अडथळा आला त्यामुळे प्रत्यक्ष यात्रा काळात असुविधेचा पाढा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा, बांधकाम विभाग या अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला जे झाले ते झाले पण उर्वरित काळात यात्रेत तात्काळ स्वछतागृह, तात्पुरते स्नानगृह तसेच घोडे बाजारात दगड-गोटे होऊ नये याची काळजी व सर्व यात्रेत पाणी मिळाले पाहिजे असा सूचना दिल्या आणि यंत्रणा कामाला लागली.

माळेगाव यात्रेत यंदा मोठी गर्दी आहे. शनिवारी खासदार प्रताप पाटील चिखलीकर माळेगाव यात्रेत दाखल झाले तातडीने यात्रेत होत असलेल्या गैरसोयी संदर्भात अधिकार्यांची बैठक घेत सुचना दिल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अमोल पाटील, बांधकाम विभागाचे उपअभियंता बिरादार, इजि शिवाजी राठोड ,तसेच पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, इजि केंद्रे महावितरण, बंदोबस्त पोलीस अधिकारी श्री डोके हे बैठकीत होते. तीन दिवस यात्रेकरूंच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेतली जावी. यात्रेत तात्काळ फिरते शौचालय उभारावे, तात्पुरते स्नानगृह उभे करावे. तसेच घोडा मैदान व ईतर ठिकाणी दगडगोटे काढणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे संदर्भात सुचना दिल्या. खासदार चिखलीकर माळेगावात दाखल होताच प्रशासन गतीमान झाल्याचे दिसून आले.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माळेगाव यात्रा असे दृढ समीकरण आहे. जेव्हा जेव्हा प्रतापराव माळेगाव यात्रेच्या नियोजनात नसतात. तेव्हा तेव्हा यात्रेत सुविधा मिळाल्या नाहीत खुद्द स्व विलासराव देशमुख यांनी२०००मध्ये यात्रा नियोजनात प्रतापराव असावे लागतात. तरच नियोजन लागते असा जाहीरपणे सांगितले. त्याचा या दीड दशकात यात्रेकरू व्यापारी याना अनुभव आला आहे. झालेली सर्व विकासकामे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यकाळातच पुर्ण झाली आहेत. जिल्हा परिषद सभापती ते खासदार या प्रवासात त्यांनी कायम माळेगाव यात्रा वाढीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे यावर्षी झालेल्या प्रशासकीय कारभारातील गैरसोयीमुळे खासदार चिखलीकर यांना यात्रेकरू व ग्रामस्थांनी साकडे घातले त्यांनीही दखल घेत माळेगाव ग्रामपंचायत येथे अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

मानकरी निवासस्थानाचे उद्घाटन
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात यात्रेला तत्कालीन आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामुळे सात कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यातून मानाची रिसनगावचे नाईक यांच्या पालखी साठी पालकी बांधण्यात आलेल्या मानकरी निवासस्थानाचे उद्घाटन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती आनंदराव शिंदे, माजी उपसभापती रोहीत पाटील, माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, मानकरी गणपतराव नाईक, संजय नाईक, चंद्रमुनी मस्के, परमेश्वर मुरकुटे, बालाजी राठोड, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, सरपंच सुधाकर जायभाय यासह मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!