Saturday, January 28, 2023
Home Uncategorized माळेगावच्या यात्रेत कलापथकाचे स्वच्छतेसाठी मंत्रमुग्ध करणारे प्रबोधन -NNL

माळेगावच्या यात्रेत कलापथकाचे स्वच्छतेसाठी मंत्रमुग्ध करणारे प्रबोधन -NNL

by nandednewslive
0 comment
घाणीचं पाणी साचत असतं दारामधी.. 
रोगराई सारी तुम्हीच आणता घरामधी…. 
बाबांनी मामा, काका नी दादा..
मी सांगते खरोखर संडास बांधा घरोघरी….
श्रीक्षेत्र माळेगाव। माळेगाव यात्रेत पाणी स्वच्छता समृद्ध आरोग्य यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये विविध कलापथक प्रबोधन घेता सादर करत आहेत.
घाणीचे पाणी साचत असतं दारामध्ये, रोगराई सारी तुम्ही आणता घरामधी. बाबां नी मामा, काकां नी दादा मी सांगते खरोखरी संडास बांधा घरोघरी अशा अनेक प्रबोधन गायक नालंदा सांगवीकर आणि बापूराव जमदाडे यांनी विविध गीतांच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी  प्रबोधन करत आहेत. या संचामध्ये सुमेध एगडे, गंगाधर एगडे, संजय कांबळे, गौतम सांगवीकर, गोविंद गोमस्कर, यासीन कवाल, दत्ता सोनकांबळे, महाजन पट्टेकर आदी कलाकार विविध गीताच्या माध्यमाने या ठिकाणी प्रबोधन करत आहेत.
   
याप्रसंगी या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, सेवा निवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव इंगोले, सेवा निवृत्त गट विकास अधिकारी उमाकांत रहाटीकर, गट विकास अधिकारी राजू तोटावार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलींद व्यवहारे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवाजी टोम्पे,माहिती शिक्षण व संवाद सल्लागार डॉ. नंदलाल लोकडे, गट समन्वयक लक्ष्मीकांत टाकळकर, दत्तात्रय इंदूरकर, नागेश स्वामी, संतोष कांबळे, प्रदीप वाठोरे, बाळासाहेब शिंदे, सुरेश हिंगमिरे आदींची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!