Thursday, February 2, 2023
Home Uncategorized माळेगाव यात्रेतील श्याम चांदणेने जिंकली मानाची कुस्ती -NNL

माळेगाव यात्रेतील श्याम चांदणेने जिंकली मानाची कुस्ती -NNL

by nandednewslive
0 comment
श्रीक्षेत्र माळेगाव। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात सुरू झालेल्या माळेगाव येथील कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती लोहा तालुक्यातील सावरगावचा श्याम निवृत्ती चांदणे  या पहेलवानाने जिंकली असून त्यांनी उमरा तालुका पालमचा अफसर अकबर पठाणची पाठ टेकवली.
     
माळेगाव यात्रेत वीर नागोजी नाईक मैदानात झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन आमदार श्याम सुंदर शिंदे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन सांगळे, उप विभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटराव मुंडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, गट विकास अधिकारी शैलेश वाव्हळे, विक्रांत शिंदे, चंद्रसेन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
   
माळेगाव येथील आखाड्यावर झालेल्या कुस्ती दंगलीमध्ये नांदेड जिल्ह्यासह लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोलीसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील पहिलवानांनी हाजरी लावली होती. लाखो यात्रे करूंच्या साक्षीने हलगीच्या तालावर अनेक पैलवानांनी आपापल्या डावपेचाद्वारे प्रतिस्पर्धी पैलवानांना चांगलीच पकड दिली. 
   
माळेगाव येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयातून मान्यवरांच्या उपस्थितीत निशान घेऊन श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यानंतर खंडोबाच्या साक्षीने कुस्तीच्या आखाडाकडे प्रस्थान करून मान्यवर व यात्रेकरू यांच्या उपस्थितीत कुस्तीची दंगल पार पडली.
माळेगाव यात्रेत सहा तमाशा मंडळांनी हजेरी लावली
 दक्षिण भारतात प्रसिद्ध असणाऱ्या माळेगाव यात्रेत विविध करमणुकीची साधने आली. यावेळी माळेगाव यात्रेत सहा लोकनाट्य तमाशा मंडळांनी आपली हजेरी लावली. यामध्ये रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, कुंदा पाटील नगरकर, तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे लोकनाट्य तमाशा मंडळ जुन्नर जिल्हा पुण,  हरिभाऊ बडे यांची मुलगी शिवकन्या बडे नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ, आदी तमाशा मंडळ आले आहेत. माळेगावच्या यात्रेमध्ये लोकनाट्यामुळे राज्याची लोकसंस्कृती जतन करण्यात आली आहे. त्याला रसिकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!