Monday, February 6, 2023
Home Uncategorized यात्रेत सुविधांचा अभाव आहे. पाणी पुरवठ्यासह यात्रेकरूंना ईतर सुविध पूर्ववतपणे द्या- खा. प्रतापराव चिखलीकर-NNL

यात्रेत सुविधांचा अभाव आहे. पाणी पुरवठ्यासह यात्रेकरूंना ईतर सुविध पूर्ववतपणे द्या- खा. प्रतापराव चिखलीकर-NNL

by nandednewslive
0 comment
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा। माळेगाव यात्रेचे वैभवात वाढ करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. यात्रेत सुविधांचा अभाव आहे. पाणी पुरवठ्यासह यात्रेकरूंना ईतर सुविध पूर्ववतपणे  देण्याचे निर्देश खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले.
     
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे आज माळेगाव यात्रेत येऊन खंडोबाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये माळेगाव यात्रे संदर्भात आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन सांगळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ,  जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
   
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निर्देशानुसार पाणी पुरवठा विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच पोलीस महिला कर्मचारी यात्रेत असलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे स्नानगृह उभारण्याचे त्यांनी निर्देश दिले.  घोडा प्रदर्शनातील मैदानातील खडे उचलण्यासाठी बांधकाम विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे.
     
पुढील यात्रेत यात्रेकरूंसाठी सार्वजनिक शौचालयाची सुविधा देण्यासाठी प्रारुप आराखडा करून जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्यांचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोककला तमाशा मंडळातील फडांना भेटी देवू  कलावंताशी संवाद साधला.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!