Tuesday, February 7, 2023
Home Uncategorized लोकाभिमूख उपक्रम हीच सुशासनाची ओळख – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

लोकाभिमूख उपक्रम हीच सुशासनाची ओळख – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| ग्रामीण व दुर्गम भागासह सर्व लोकांची शासनाशी संबंधित असलेली सर्व कामे पारदर्शक पद्धतीने व निर्देशीत केलेल्या कालावधीत निकाली निघाली पाहिजेत. यासाठी लोकाभिमूख प्रशासन महत्वाचे असते. प्रशासकीय पातळीवर याला अधिक गती मिळावी व कर्तव्य तत्परता वाढावी यादृष्टिने 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो.

लोकाभिमूख उपक्रम हीच सुशासनाची ओळख असते. याला चालना मिळावी व जिल्ह्यात ज्या-ज्या विभागामार्फत अधिक पारदर्शक व लोकाभिमूख कामे पार पडली आहेत अशा कामांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते. चांगले उपक्रम हे सदैव राबविण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. सुशासन सप्ताह व 25 डिसेंबर रोजी साजरा केल्या जाणाऱ्या सुशासन दिनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, भोकर तहसिलदार राजेश लांडगे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) रेखा काळम यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत सचित्र सादरीकरण केले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!