
अर्धापूर, नीळकंठ मदने| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत घेण्यात आलेल्या पदवी उन्हाळी परीक्षा 2022 या परीक्षेत श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथील विद्यार्थिनी कु. कुंता पंडित दुधाटे हिस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्याकडून भूगोल विषयात सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

यामध्ये बी.ए. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे भूगोल विषयाचे गुण एकत्रित केले जातात व त्यातून प्रथम क्रमांक येणाऱ्यास सुवर्णपदक दिले जाते. विद्यापीठाने पदवी दीक्षांत समारंभामध्ये दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकाची यादी जाहीर केली असून त्यामध्ये दुधाटे यांना सुवर्णपदक पदक घोषित करण्यात आले.

तीच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ना.अशोकराव चव्हाण,उपाध्यक्षा, माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण,सचिव,माजी मंत्री डी.पी.सावंत, सहसचिव उदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, कार्यकारिणी सदस्य मा.नरेंद्र चव्हाण,प्राचार्य डॉ.के.के.पाटील, भूगोल विभागाचे प्रा.डॉ.एस.जी. बिराजदार, डाॅ.परमेश्वर पौळ,डाॅ.बालाजी आव्हाड व आदींनी अभिनंदन केले आहे.

