Thursday, February 2, 2023
Home Uncategorized सुविधेचा अभाव तरीही मीडिया सेंटर माळेगाव यात्रा प्रसिद्धीसाठी तत्पर -NNL

सुविधेचा अभाव तरीही मीडिया सेंटर माळेगाव यात्रा प्रसिद्धीसाठी तत्पर -NNL

माळेगाव यात्रेत शुध्द पाणी पुरवठा विभागाचा दावा

by nandednewslive
0 comment

लोहा| गेल्या दहा वर्षा पासून माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या मीडिया चे प्रमुख मिलिंद व्यवहारे व सहकारी कोणतीही अडचण न सांगता यात्रेची प्रसिद्धी करतात यंदा तर बसण्याची सोय नाही आणि खर्चाची तरतूद नाही. असाही अवस्थेत यात्रेचे सकारात्मक वृत्ताकन आणि फोटोसह प्रसिध्द देण्याचे काम तत्परतेने ड्युटी प्रामाणिकपणे बजावत सुरू आहे.

माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने मीडिया सेंटर दरवर्षी स्थापन करण्यात येते. गेल्या दहा वर्षापासून हे मीडिया सेंटर असून या मीडिया सेंटर मार्फत माळेगावच्या बातम्या माध्यमांना पुरवल्या जातात.सेंटरला जिल्हा परिषदने कोणत्याही सुविधा दिली नाही. तशी तरतूदही ठेवली नसल्याचे दिसते. मीडिया सेंटरचे अधिकारी -कर्मचारी स्वतःच खर्च करून मीडिया सेंटर चालवत आहेत. या खरकचाऱ्यांची केलेला खर्च तरी जिल्हा परिषद देईल का? हा प्रश्न आहे.

माध्यमातील तज्ञ व्यक्ती जिल्हा परिषदेकडे आहेत. फुकटची प्रसिद्धी देखील जिल्हा परिषदेला चांगल्या पद्धतीने करून घेता आली नाही, याचे दुर्दैव वाटते. नेटची सुविधा नसतानाही मीडिया सेंटरचे कर्मचारी माळाकोळी व लोहा येथे जाऊन माळेगाव येथील वृत्तांत. बातम्या आणि छायाचित्रे माध्यमांना पाठवत आहेत. जिल्ह्याचे खासदार तसेच जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मीडिया सेंटरच्या प्रमुख व त्याच्या सहकाऱ्यांची दखल घेऊन यात्रेत जाहीर सन्मान करायला हवा अशी अपेक्षा लोहा तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

माळेगाव यात्रेत शुध्द पाणी पुरवठा विभागाचा दावा
नांदेडसह परभणी लातूर जिल्हाच्या सिमेच्या मध्यवर्ती असलेल्या माळेगाव येथे दक्षिण भारतातील खंडोबाची मोठी यात्रा भरते, या यात्रेत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व यात्रेत येणाऱ्या प्राण्यांसाठी शुध्द पाणी पुरवठा करण्यात येत आहे. खंडोबाच्या माळेगाव दररोज सरासरी किमान दोन-तिन लाख भाविक यात्रेत दर्शनासाठी येत असतात. तसेच यात्रेत उंट, घोडा, गाढव, कुत्रा, शेळी आदी पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. सर्वांना पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने शुध्द पाणी पुरवठा केला जात आहे.

banner

उर्ध्व मानार प्रकल्पातील मुख्य विहीरीवरून शुध्दीकरण प्रकल्पापर्यंत पाणी आणलं जातं. पाणी पुरवठा संतुलित करण्यासाठीचे नियोजन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दररोज 4.81 दसलक्ष क्षमतेच्या जलकुंभातील पाणी अविरतपणे माळेगावत आणि यात्रा परिसरात करण्यात येत आहे. यात्रेत 20 डिसेंबर पासुन प्राण्यांसाठी 12 हौदामध्ये शुद्ध पाणी साठवण्यात आले आहे. तसेच आठ टॅकरव्दारे कृषी प्रदर्शन, कुस्ती मैदान, लोककला महोत्सव परिसर, घोडा लाईन, आदी ठिकाणी शुध्द पाणी पुरवठा केला जात आहे. माळेगाव यात्रेत शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग चोवीस तास माळेगावमध्ये तळ ठोकुन आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी यांत्रीकी विभागाचे उप अभियंता आडबलवार, उप अभियंता शिंदे, शाखा अभियंता केंद्र आदी परिश्रम घेत आहेत.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!