
माळेगाव मीडिया सेंटर| श्री क्षेत्र खंडोबा यात्रा माळेगाव येथे अश्व विक्रीसाठी मुदतशीर अन्सारी रा. रायबू नगर हैदराबाद यांनी मारवाडी जातीचा अश्व आणल होता. गाडीतून खाली उतरवताना अश्वाच्या जिभेचा 75% भाग मार लागून निकामी झाला होता.

पशुसंवर्धन विभागाचे अस्थाई पशु वैद्यकीय दवाखाना येथे पशुपालकांनी आश्वाला उपचारासाठी आणले. अश्वाच्या जीभेची पाहणी केली असता, जिभेचा 75% भाग फाटला असे दिसले. शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे डॉ.आर. एम. पुरी यांनी पशुपालकांना सांगितले.

आश्वाची अवघड शस्त्रक्रिये करण्यासाठी घोड्याला पूर्ण भूल देऊन डॉ. आर.एम. पुरी, डॉ. श्रीनिवास जिंकलोड व डॉ. प्रकाश हाके यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेसाठी मदतनीस साईनाथ टर्के, शेख सिकंदर, बळवंत शिंदे यांनी सहकार्य केले.

