Thursday, February 2, 2023
Home नायगाव आंतरशालेय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल प्रथम -NNL

आंतरशालेय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल प्रथम -NNL

by nandednewslive
0 comment

नायगांव, रामप्रसाद चन्‍नावार। ब्लू बेल्स इंग्लिश स्कुल नायगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या सोळाव्या आंतरशालेय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नावीन्यपूर्ण सादरीकरण करीत नांदेड येथील नामांकित शाळा ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल निळारोड नांदेड यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.

शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. क्षितिजा बोडके या विद्यार्थिनीने योग्य आचरणातून योग्य समाज घडतो ,योग्य आचारसंहिता व नैतिकमूल्ये मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणतात आणि शिस्तीतूनचं नैतिकता विकसित होते यावर आपले मतप्रदर्शन करीत स्पर्धेत यश संपादन केले. सदरील स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील व तेलंगणातील वीस शाळांनी सहभाग घेतला होता. पोस्टर मेकिंग स्पर्धेत याच शाळेतील ईयत्ता दहावीची शगुन मलाकदार या विद्यार्थिनीने विशेष प्रावीण्य मिळविले. ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, प्रा.रवींद्र पा.चव्हाण ब्लू बेल्स इंग्लिश स्कुलचे संचालक हरीबाबू सर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूलचे संचालक तथा अध्यक्ष श्रीनिवास धावरशेट्टी , सचिव सौ. उमादेवी धावरशेट्टी, मुख्याध्यापक सुबोजीत घोष व ईतर शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना सौ.आशिया खान व सौ. अश्विनी भोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!