
नांदेड। लोहा तालुक्यातील ग्रामपंचायत कांजाळा येथील नवनिर्वाचित थेट सरपंच शामसुंदर माधवराव लोहकरे यांची निवड झाल्यानंतर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

कांजाळा येथील ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये थेट जनतेतुन सरपंच म्हणून गुरुकृपा युवा परिवर्तन ग्राम विकास पॅनल चे शामसुंदर माधवराव लोहकरे व गटाचे आठ सदस्य निवडून आल्यानंतर २५ डिसेंबर रोजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी पंचायत समिती प्रतिनिधी शंकरराव पाटील ढगे, श्रीनिवास लोहकरे,संजय लोहकरे, तिरूपती पेंटे , ग्रामपंचायत सदस्य,शिवानंद भोंग , शिवानंद लोहकरे, कैलास गायकवाड,चंद्रकांत लोहकरे, मंहमद शेख,माधव आढाव कामाजी मरवाळे, यांच्या सह माधवराव लोहकरे, संतोष लोहकरे, भगवान सुताडे यांच्या सह गावकरी होते. यावेळी खासदार यांनी सरपंच व नवनिर्वाचित सदस्य यांच्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

