
भोकर, गंगाधर पडवळे। धर्माबाद पोलिसांनी चोरीची दुचाकी हस्तगत केली असता भोकर येथील दुचाकी चोराचे यात नाव समोर आल्याने त्या दुचाकी चोरांना तपसासाठी ताब्यात घेतले असता भोकर व भोकर परिसरातील अनेक दुचाकी चोरी केल्याचे त्यांचे नाव आल्याने भोकर पोलिसांनी तपास चक्र फिरवले असता धर्माबाद च्या गुन्ह्यातील ५ व भोकर व परिसरातील १५अशा एकूण जवळपास २०दुचाकी विविध ठिकाणाहून भोकर पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून तपासचक्र सुरूच असून उद्या पर्यंत आणखीन चोरीच्या दुचाकिंची संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

धर्माबाद पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते व पोलीस कर्मचारी दि.२४डिसेंबर २०२२ रोजी धर्माबाद शहरात वाहन तपासणी करीत असतांना नंबर फलक नसलेली एक स्प्लेंडर दुचाकी घेऊन फिरताना एक संशयित त्यांना आढळला यावेळी त्याची कसून चौकशी केली असता ती दुचाकी भोकर येथील फारूक नासीर पठाण, शाहरुख युशूफ सौदागर, शेख शफी यांच्या कडून विकत घेतल्याचे सांगितले ती दुचाकी चोरीची असल्याची बाब समोर आल्यावरून धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक भोकर येथे दि.२५ डिसेंबर २०२२पाठविले यावेळी भोकर येथील पो. का. सुनील सांभाळकर व सायबर सेल चे जमादार राजेंद्र सिटीकर यांच्या मदतीने भोकर येथून शाहरुख सौदागर, व फारूक पठाण या दोघांना या वरील पाथकाने ताब्यात घेतले तसेच त्यांची चौकशी केली असता धर्माबाद, व इतर पोलीस ठाण्याच्या कर्यक्षेत्रातून त्यांनी विकलेल्या९ चोरीच्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या.

अधिक तपासासाठी भोकर पोलिसांनी शाहरुख सौदागर व त्याचे अन्य तीन सहकारी यांना ताब्यात घेतले असता चौकशीत यांनी अनेक दुचाकी चोरून विविध ठिकाणी विकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे,दिगंबर पाटील, राम कराड, राणी भोंडवे, सहाय्यक पो. उप.नि. दिलीप, संभाजी हनवते,जमादार बालाजी लक्षटवार,संजय पांढरे,भीमराव जाधव, चालक जमादार राजेश धुताडे, पो. का.ज्ञानेश्वर सरोदे, सोनाजी कानगुले, नामदेव शिरोळे, मंगेश पाटील, व आदी पोलिस कर्मचाऱ्यांचे वेग वेगळे पथक तयार करून उपरोक्त चोरांनी विकलेल्या दुचाकीचा विविध ठिकाणी शोध घेतला असता धर्माबाद कार्यक्षेत्रातील चोरीच्या पाच दुचाकी व भोकर कार्येक्षेत्रातील १५अशा एकूण २०मिळून आल्या असून त्या दुचाकी भोकर पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

अध्यापही भोकर पोलिसांचे तपास व शोध सुरु असून उद्या पर्यंत या चोरीच्या दुचाकीच्या संख्येत अधिकची भर पडण्याची शक्यता आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकी चोरां पैकी एकजन एका राष्ट्रीय पक्षाचा माजी पदाधिकारी व कार्यकर्ता असल्याची खळबळजनक बाब समोर आल्याने कोणत्या चमकोगिरी कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवावा असा प्रश्न विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांना पडला आहे?

ज्यांनी सदरील लोकांकडून दुचाकी घेतल्या आहेत व दुचाकिंची कागदपत्रे नसतील त्यांनी भोकर पोलिसात जमा कराव्यात -पो. नी. विकास पाटील नुकतेच दुचाकी चोरीचे रॅकेट उघडकीसआले असून आम्ही त्या गुन्ह्यातील चार आरोपीना ताब्यात घेतले आहे या तपासात ज्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत त्या अनेक दुचाकीचे नंबर बनावट असून विकत घेणाऱ्यांनाकडे कागदपत्रे नाहीत अशी बाब समोर आली आहे. त्यामुळे भोकर पोलिसांकडून असे आवाहन करण्यात येते की उपरोक्त दुचाकी चोरांनी विकलेल्या व ज्यांनी खरेदी केल्यात त्या दुचाकीचे कागदपत्रे नाहीत अशांनी स्वतः होऊन त्या दुचाकी भोकर पोलीस यांच्या ताब्यात द्याव्यात अन्यथा खरीद दारांना देखील सह आरोपी केलं जाईल असे पो. नी. विकास पाटील यांनी म्हटले आहे.

