नांदेड। शाखांचे उद्घाटन / मेळावे / जाहीर सभा / कॉर्नर सभा घेत छत्रपती संभाजी राजेंनी राजकीय मोट बांधणीस सुरुवात केल्याचे दिसत आहे. दोन तीन दिवस नांदेड दौऱ्यादरम्यान स्वराज्य संघटनेच्या जवळपास ७० शाखांचे उद्घाटन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर व हदगाव तालुक्यात स्वराज्य संघटनेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शुक्रवार दि. २३ व शनिवार दि. २४ रोजी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक गावात अनोख्या पद्धतीने स्वराज्य चे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवसाच्या सांगता सभेमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी स्थानिक प्रश्नांसोबतच विधानसभेत होत असलेल्या गदारोळाविषयी भाष्य करताना सरकार सह विरोधकांवर निशाना साधला.
काल शेतकरी दिन असून देखील शेतकऱ्यांसाठी सरकार काहीही करत नसल्याचे भाष्य छत्रपती संभाजी महाराजांनी केले. सोबतच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत स्वराज्य ला मिळालेल्या विजयामुळे स्वराज्य ने राजकारणात यावे ही लोकांची भावना असल्याचे बोलत स्वराज्य बाबत राजकीय संकेत दिले. अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काहीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे संभाजीराजेंनी टिका केली. युवकांच्या प्रतिसादामुळे बऱ्याच ठिकाणचे कार्यक्रम वेळेपेक्षा दोन ते अडीच तास उशीराने होत होते.
गावच्या गाव शाखा उद्घाटन सोहळ्यास उपस्थीत राहत आहेत.गावातील तरुन , विद्यार्थी , महीला , पुरुष , जेष्ठ एक दिल्याने उपस्थीत राहील्याने गावो गावी छत्रपती संभाजीराजेंना सभा घ्याव्या लागल्या. गावाच्या प्रवेश द्वारा पासुन गावठांना पर्यंत वाजत गाजत ग्रामस्थ मिरवणुक काढत आहेत. अनेक गावांत ग्रामस्थ स्वराज्य संघटने ऐवजी पक्षात रुपांतर करण्याची मागणी करीत आहेत.
सध्या महाराष्ट्रात २० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्य निवडुन आल्याने छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेचे पदाधिकाकी राजकीय चाचपनी देखील करीत आहेत. स्वईछेने जर पॅनल निवडुन येतात तर जाहीर केल्या मोठा प्रतिसाद असेल हे नाकारता येत नाही. या दौऱ्यापुर्वी रायगड , नाशिक , परभणी आत्ता नांदेड जनतेने प्रचंड प्रतिसाद स्वराज्य संघटनेला दिला आहे. महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्य नवीन राजकिय पर्याय उपलब्ध होऊ शकतो असे स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॅा धनंजय जाधव म्हणाले.
स्वराज्य संकल्प अभियान, नांदेड दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच्या हिमायतनगर येथील सांगता सभेत भाषण करून स्वराज्य संघटनेचे धोरण स्पष्ट केले.जनतेच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, लोकप्रतिनिधींनी केलेली दुर्लक्ष व अधिवेशनात सरकार विरोधकांनी मांडलेला २८८ आमदारांपैकी एकही आमदार महाराष्ट्रातल्या प्रश्नांवर बोलत नाही त्यांचे प्रश्न कोण कोणामुळे मेले कोणी किती रुपयाचे भूखंड विकले कोणी किती भ्रष्टाचार केला याच्यावर विधान भवन बंद पाडत आहे.
या सर्व आमदारांचा स्वराज्य संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनता नांदेडकर वासीय छत्रपतींना ज्या पद्धतीने साथ देत आहे याचा अर्थ हे सर्व राजकीय पक्ष सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहे चा यांच्यावरचा विश्वास आता पूर्णपणे उडाला आहे. म्हणून नवीन पर्याय म्हणून छत्रपती संभाजी राजांनी काढलेली स्वराज्य संघटना ही पक्षात रूपांतर व्हावी सर्वसामान्य लोकांना वाटत आहे म्हणूनच आज एवढ्या मोठ्या संख्येने लोक शाखा उद्घाटन सभेसाठी आपली उपस्थिती देऊन छत्रपतींची ताकद वाढवत आहे. छत्रपती संभाजी महाराज रयतेच्या बांधावर जाऊ शकतात, प्रश्न सोडवू शकतात मग लोकप्रतिनिधी फक्त मते मागायला येतात का? म्हणून रयतेच्या प्रतिसादा मुळेच स्वराज्यने राजकारणात यायला हवे, अस मत स्वराज्य संघटना राज्याचे संपर्कप्रमुख करण गायकर यांनी व्यक्त केले.
सत्ताधारी व विरोधकांनी पैशातून सत्ता , सत्तेतून पैसा मिळवली आहे. अशा भ्रष्टाचारी सत्तेत बसलेल्या कठाळ्यांना व्यसन घालण्यासाठी स्वराज्य गोरगरीब कष्टकर शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना महिलांना सुशिक्षित बेरोजगार युवकांना न्याय देण्यासाठी शेतीमालाला हमीभाव मिळावा शेतकऱ्यांना 24 तास वीज मोफत मिळावी ,18 पगड जातीतील 12 बोलताना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना झाली असे प्रतिपादन स्वराज्य संघटनेचे माधवराव देवसरकर यांनी आपल्या भाषणात मांडले आहे.
यावेळी विचार मंचावर स्वराज्य संघटनेचे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य संघटनेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख करण गायकर , सरचिटणीस डॉ धनंजय जाधव, मराठवाडा विभाग प्रमुख माधवराव देवसरकर, मराठवाडा विभाग प्रमुख आप्पासाहेब कुढेकर , मराठवाडा संपर्क प्रमुख गंगाधर काळकुटे, निमंत्रक अंकुश कदम ,रघुनाथ चित्रे पाटील ,माऊली पवार ,संजय पवार, डॉ रुपेश नाटे, राजेश मोरे ,मंगेश कदम ,विनोद परांडे ,व अन्य मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. ही सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे तिरुपती भगनुरे, सदानंद पुयड ,बालाजी कराळे, गजानन सोळंके, नवदीप वानखेडे ,विश्वजीत पवार ,पवनकुमार मोरे, कृष्णा गिरामकर ,सुरेश सूर्यवंशी, शिवराज वरकड ,उत्तम मिरासे , राम सूर्यवंशी ,वामन मिरासे ,अमित पाटील ,अवधूत पाटील, बालाजी ढोणे ,मुन्ना शिंदे ,व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनी परिश्रम घेतले आहे.