
हदगाव /तामसा, गजानन जिदेवार। हदगाव तालुक्यातील तामसा ही सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. पण या ठिकाणी दररोज अनेक खेड्यापाड्यातील लोक शाळकरी मुली तसेच ज्येष्ठ नागरिक आपल्या विविध कामासाठी बस स्थानक परिसरात येत असतात परंतु येथील सुलभ शौचालय बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांची यात नाहक त्रास होताना दिसत आहे. या प्रश्नाविषयी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की तामसा हे गाव हदगाव हिमायतनगर, नांदेड ,भोकर या चारही तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्याचबरोबर येथे जुनी मोठी बाजारपेठ असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते परंतु येथील बस स्थानक परिसरात अनेक दिवसापासून सुलभ शौचालय बंद अवस्थेत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे .

यामुळे प्रवासी आणि परिसरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्याचबरोबर येथे अनेक जण बाहेरच शौचास आणि लघुशंकेस जात असल्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याचा विपरीत परिणाम प्रवाशांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. परंतु याबाबत एसटी महामंडळ प्रशासन बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे.त्याचबरोबर बस स्थानक परिसरातील येणारे अनेक जण उघड्यावर लघुशंका करण्यासाठी बस स्थानक परिसरात येत असतात. त्यामुळे प्रवासी तसेच या भागात राहणाऱ्या अनेक नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

