Sunday, January 29, 2023
Home Uncategorized “बहना भाग मत जाना” या युवती संस्कार शिबिराला उदंड प्रतिसाद -NNL

“बहना भाग मत जाना” या युवती संस्कार शिबिराला उदंड प्रतिसाद -NNL

शेकडो मुलींनी आई-वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न न करण्याची व लव्ह जिहाद विरुद्ध लढण्याची प्रतिज्ञा घेतली

by nandednewslive
0 comment

नांदेड, अनिल मादसवार| भाजपा महानगर नांदेडतर्फे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी अकराव्या वर्षी आयोजित केलेल्या “बहना भाग मत जाना” या युवती संस्कार शिबिरात सुप्रसिद्ध व्याख्याते सोपानदादा कनेरकर यांनी केलेल्या नर्म विनोदी मार्गदर्शनामुळे शिबिरात उपस्थित राहिलेल्या शेकडो मुलींनी आई-वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न न करण्याची व लव्ह जिहाद विरुद्ध लढण्याची प्रतिज्ञा घेतली.

हसत हसत अंतर्मुख करणाऱ्या व शेवटपर्यंत रंगलेल्या या शिबिरासाठी एनएसबी कॉलेज नांदेडचे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह खचाखच भरलेले होते.सुरुवातीला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. सोनिया उमरेकर यांच्या हस्ते व भाजपा महिला जिल्हाध्यक्षा वैशाली देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन करून शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर सुषमा ठाकूर, सुरेखा किनगावकर,चंदना विनय भंडारी, गिता झंवर, डाॅ.परविंदरकौर महाजन,लाजवंती प्रेमचंदानी, अर्चना आशिष काबरा, सुनिता वट्टमवार, माधवी गुम्मलवार, प्रणिता अखिल गुप्ता,सुचिता उकलकर, सारिका मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी राबवीत असलेल्या ७८ उपक्रमापैकी त्यांचा सर्वात आवडता हा उपक्रम असल्याचे सांगून यापूर्वी या शिबिरात सहभागी झाल्यामुळे अनेक मुलींनी पळून जाण्याचा निर्णय बदलल्याचे सांगितले.सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ.सोनिया उमरेकर,राजपुत महिला प्रदेशाध्यक्षा सुषमा ठाकूर,भारतीय स्त्रीशक्ती महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्षा सुरेखा किनगावकर यांची समायोजित भाषणे झाली. मुख्य मार्गदर्शक असणाऱ्या सोपानदादा कनेरकर यांनी आपल्या अमोघ वाणीने जमलेल्या शेकडो स्त्रीशक्तींना मंत्रमुग्ध केले. कधी पुराणातील दाखले देत तर कधी ऐतिहासिक संदर्भ देऊन त्यांनी सोप्या शब्दात विषय मांडला.

banner

अख्खे आयुष्य मुलींच्या भल्यासाठी खर्च करणाऱ्या आई-वडिलांपेक्षा जेव्हा अल्पावधीत आयुष्यात आलेल्या तरुणावर विश्वास ठेवून मुली पळून जाण्याचा निर्णय घेतात. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही अपमानाने आयुष्यभर होळपळत असते हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले. पालकांनी देखील आपल्या मुलांना सुख सुविधा उपलब्ध करून देताना त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. जगावेगळे उपक्रम राबविणारे दिलीप ठाकूर सारखे व्यक्तिमत्व आतापर्यंत पाहिले नाही.सर्वश्रेष्ठ असलेल्या हिंदू धर्माचा प्रत्येक तरुणींना अभिमान असला पाहिजे. येथून पुढे फक्त स्वधर्मातील व्यावसायिकाकडूनच खरेदी केली तर लव्ह जिहादची सुरुवातच होणार नाही असे त्यांनी सांगितले. कधी खळखळून हसवणारे तर कधी डोळ्यात पाणी आणणारे कनेरकर यांचे मौलिक विचार ऐकून प्रभावित झालेल्या उमा आरेवार व इतर सर्व मुलींनी लव्ह जिहाद विरुद्ध आयुष्यभर लढण्याची प्रतिज्ञा घेतली.

उपस्थित राहणाऱ्या सर्व मुली व महिलांना क्यूटीस बायोटेकतर्फे तीनशे रुपयाची आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. सनातन व हिंदू जनजागरण समितीतर्फे सर्व मुलींना लव्ह जिहाद हे पुस्तक मोफत वितरित करण्यात आले. सोडतीद्वारे पात्र ठरलेल्या दोन मुलींना भडके कॉम्प्युटर्स तर्फे मोफत प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वर्षा सुनील भडके यांच्या हस्ते तर इतर दोघींना टॅली प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सविता काबरा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.शिबिराला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाल्यामुळे सभागृहातील आसनव्यवस्था कमी पडल्याने अनेकांनी चक्क जमिनीवर व व्यासपीठावर मिळेल त्या जागी ठाण मांडली. जागेअभावी सभागृहाबाहेर थांबून अनेकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे अतिशय प्रभावी सूत्रसंचलन प्रा. क्षमा करजगावकर यांनी केले. भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष परळीकर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, पूजा बिसेन, निर्मला अग्रवाल, अरुणा कुलकर्णी, शततारका पांढरे, पुनमकौर धूपिया, प्रणिता देशमुख, नंदा चौहान, शालिनी गोजे,महानंदा नावदगे, प्रीती चौहान, शांता चक्रवार,सिंधू देवसरकर, शुभदा कोंडलवाडीकर, गीता भारतीया, प्रतिभा राठी यांच्यासह अनेक महिला व मुलींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिरबल यादव ,राजेशसिंह ठाकूर, गंगाप्रसाद यन्नावार,संतोष भारती, गणेश यशवंतकर, कुमार अभंगे, शिवा लोट, राजेश यादव, कामाजी सरोदे, प्रशांत पळसकर, अरुण काबरा, सुरेश शर्मा, मनोज जाधव, सनथकुमार महाजन,सुरेश लोट, जान्हवी चौहान, शुभिक्षा ठाकूर, चक्रधर खानसोळे , महेंद्र शिंदे, करण ढगे यांनी परिश्रम घेतले. हिंदू मुलींना जागृत करण्यासाठी एका वेगळ्या विषयावर कार्यक्रम घेऊन संस्कारीत करण्यासाठी धडपडणारे दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!