नांदेड। नांदेड जिल्हा भावसार क्षत्रिय समाज कार्यकारणी तर्फे पंधरावा उपवधू वर परिचय मेळावा मातोश्री मंगल कार्यालय जुना कौठा नांदेड येथे भव्य दिव्य स्वरूप व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ व्यंकटेश काब्दे तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.हेमंत पाटील,पुणे येथील उद्योजक अनिल ढवळे ,जालना येथील सामाजिक कार्यकर्त्या रेणुका भावसार ,उद्योजक गिरीश वायचाळ ,समाज कल्याण अधिकारी तेजस माळवदकर ,सौ. राजश्री हेमंत पाटील ,जिल्हा भावसार समाजाचे अध्यक्ष गंगाधर बडवणे सचिव सुरेश गोजे कार्याध्यक्ष गिरीश बुलबुले ,लक्ष्मीकांत माळवतकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. खा .हेमंत पाटील यांनी औंढा नागनाथ येथे नांदेड जिल्हा भावसार समाजाने दहा हजार स्क्वेअर फिट जागा उपलब्ध करून दिल्यास भव्य वास्तु उभारणीसाठी दहा लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले .यावेळी मान्यवरांची समायोजित भाषणे संपन्न झाली .
समाजातील अकराशे उप – वधुवरांची संकलितरुपी ‘ अनुरूप ‘ नावाची स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली .भव्य प्रांगणात चार डिस्प्ले स्क्रीनच्या मदतीने वधू-वरांचे बायोडाटा दाखविण्यात येत होते .मेळाव्यास उपस्थित असलेल्या उपवधू -वर , पालक व नातेवाईक अशा दहा हजार व्यक्तींची अतिशय अल्प दरात चहा नाश्ता व जेवनाची सोय समाजातर्फे करण्यात आली होती .समाजातील उपवधूवरांना व्यासपीठावर बोलावून संयोजकांच्या मार्फत यांचा परिचय उपस्थितांसमोर करून देण्यात येत होता .उपवधू वर व पालक यांच्यात चर्चा व विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून वीस समन्वय कक्षांची विशेष व्यवस्था याप्रसंगी करण्यात आली होती .सदर मेळाव्याचा लाभ महाराष्ट्र व्यतिरिक्त आंध्र प्रदेश ,तेलंगाना ,गुजरात , मध्य प्रदेश आदि राज्यातील सुमारे आठ हजार समाज बांधवांनी घेतला .
मेळावा यशस्वीतेसाठी नांदेड जिल्हा भावसार समाज ,१५ वा उपवधू वर परिचय मेळावा समिती नांदेड ,भावसार युवा मंडळ ,भावसार प्रगती महिला मंडळ , भावसार सेवा संघ तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवक महिला मंडळ व्यापारी कर्मचारीवर्ग आदिंनी परिश्रम घेतले असे पंधरावा उप वधु वर परिचय मेळावा समितीचे प्रसिद्धी प्रमुख अनिरुद्ध दांडगे यांनी कळविले आहे .
-अनिरुद्ध नृसिंहराव दांडगे . प्रसिद्धी प्रमुख, भावसार उप वधू वर परिचय मेळावा समिती नांदेड.