नायगांव, रामप्रसाद चन्नावार। महाराष्ट्र नाभिक संघटनेच्या नायगांव तालुकाध्यक्ष पदी दत्तात्रय रातोळीकर यांची सर्वानुमते जिल्हाअध्यक्ष याच्यां उपस्थितीत एका कार्यक्रमात निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ ही संघटना नाभिक समाजाच्या विविध प्रश्नावर महाराष्ट्र भर काम करत असते २४ डिसेंबर २०२२ रोजी नायगांव येथील मार्कण्डेयश्वर मंदीर येथे तालुक्यातील सर्व समाज बांधवाची बैठक घेऊन गेली अनेक वर्षापासून स्वतःचा व्यवसाय सांभाळून सामाजिक चळवळीत योगदान देणारे दत्तात्रय गायकवाड रातोळीकर यांची सर्वानुमते नाभिक संघटनेच्या नायगांव तालुकाध्यक्ष पदी निवड करून उपस्थीत मान्यवरांच्या हास्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या वेळी तालुक्याची उर्वरित कार्यकारणी ही करण्यात आली आहे.
यावेळी नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मोगडपले, युवक जिल्हाअध्यक्ष बाबु गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष मोगलाजी लिंगमपल्ले ,दता चपलाक, प्रकाश श्रीमंगले, बालाजी गायकवाड, शंकर कोतवाल , विश्वनाथ गायकवाड, माधव सजन, संतोष नरसीकर ,विठ्ठल कोतवाल , सुरेश गायकवाड, साई कंचलवाड ज्ञानेश्वर गंगोत्री , साईनाथ कोतवाल अदीची उपस्थिती होती.