उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड राज्यात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रा दरम्यान चोरटे त्याचा फायदा उचलत असून यात्रेसाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरावर डल्ला मारत आहेत. असाच एक प्रकार उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर ता.लोहा येथे घडला. यामध्ये येथील एक कुटुंब यात्रेला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी २ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी घडली.
कलंबर येथील रहिवासी कारचालक अभिजित चंदेल हा घराला कुलूप लाऊन माळेगाव यात्रेला गेला होता. यावेळी घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी २३ डिसेंबर रोजी रात्री घराच्या खिडकीचा कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील नगदी १ लाख ८० हजार रुपये व सोन्याचे मिनी गंठण असा एकूण २ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उस्माननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे