
अर्धापूर,निळकंठ मदने| मुख्यमंत्री मदत कक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी शनिवारी या विभागाचे जिल्हाध्यक्ष कै.सुभाषीश कामेवार यांच्या हद्यविकाराच्या झटक्याने अचानक निधनानंतर शनिवारी मालेगाव येथे भेट देऊन कामेवार कुटुंबीयांचे सांत्वन केले.

वैद्यकीय शिवसेना मदत समीतीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाषीश कामेवार यांचे गूरुवारी ह्दय विकारांच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागोराव इंगोले, प्रल्हाद इंगोले, संजय इंगोले,कृष्णा इंगोले,प्रा.शरद वाघमारे, विवेक चिंचडवाड,हिरामण वाघमारे,नागोराव वाघमारे, सचिन इंगोले,देवीदास डाकूलगे,सुभाषिश कामेवार मित्र परिवार उपस्थित होते.

