नवीन नांदेड। जनता शिक्षण प्रसारक मंडळ, उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय,सिडको येथे वीर बालदिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.व्ही.के. हंगरगेकर,पर्यवेक्षक तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक एन.एम.भारसावडे, एस.आर. बीरगे, डी. जी.पवार, सौ. ए. जी. देगावकर, बी.जी. हंबर्डे,बी.बी. पाटोळे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बालवीर साहिबजादे जोरावर सिंहजी व फतेहसिंहजी यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण केला. सहशिक्षक बी.बी.पाटोळे व पर्यवेक्षक एन.एम. भारसावडे यांनी बालवीरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर प्राचार्य प्रा.व्ही.के. हंगरगेकर यांनी अध्यक्षीय समारोप केला.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक प्राध्यापक व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ए जी.देगावकर यांनी केले तर शंकर कापसे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामराव विजापुरे यांनी विशेष प्रयत्न केले.