
हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी फाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड द्वारा दिनांक 4 जानेवारी रोजी एक दिवसीय बौद्ध धम्म परिषद होणार आहे. कार्यक्रमासाठी परिसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रम स्थळी जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदाचा धम्म परिषदेला महाराष्ट्रातील थोर सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांची सत्यवाणी कार्यक्रम होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने संयोजन समिती अध्यक्ष त्रिरत्न कुमार भवरे व निमंत्रक कैलासराव माने पोटेकर यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांचा याच कार्यक्रमात सन्मान होणार असल्याची माहिती नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.

एक दिवसीय धम्म परिषदेचे अध्यक्ष हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर तर उद्घाटक म्हणून किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम, तर स्वागत अध्यक्ष प्राध्यापक मोहन मोरे माजी नगराध्यक्ष पूर्ण हे उपस्थित राहणार आहेत. एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेनिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2022 23 प्राप्त. अभियंता प्रशांत ठमके ,बालाजी बच्चेवार, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ अध्यक्ष माननीय गोवर्धन बिर्याणी ,एस जी माळोदे, अविनाश राऊत, बी,एन, ठाकूर, डॉक्टर आनंद सूर्यवंशी , सेवानिवृत्ती शिक्षिका जनाबाई मारुतीराव पोपुलवार,आर.एच. एडके ,बी एस .चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी हिमायतनगर, अनिल महामुने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती किनवट , बि.डी . भुसनूर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिमायतनगर, अडवोकेट राणी पद्मावती बंडेवार, डॉक्टर राजेंद्र वानखेडे हिमायतनगर, अनिल कांबळे, श्रीनिवास मुगावे ,साहित्यिक डॉ. मारुती वाघमारे आंदेगावकर, उजमा पठाण ग्रामसेविका धानोरा, अभियंता भरत कुमार कानीदे एकंबेकर, आदी मान्यवरांना या ठिकाणी गौरवण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक कैलासराव पोटेकर यांनी दिली.

सोनारी फाटा येथील एक दिवशी बौद्ध धर्म परिषदेला विशेष उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शांताबाई पवार, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन हंबर्डे ,नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर , शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर ,माजी आमदार विजय भाऊ खडसे उमरखेड ,लोकनेते बाबुरावजी कदम कोहळेकर, शपथ आमना मॅडम विशेष पोलीस अधिकारी भोकर ,डी एन गायकवाड तहसीलदार हिमायतनगर, एमडी आंदेलवाड गटविकास अधिकारी हीमायतनगर एस एम तायडे कार्यकारी अभियंता जि प बांधकाम विभाग भोकर अभियंता अशोक भोजराज जिल्हा जलसंधारण अधिकारी जि प नांदेड सुनील पोपुलवार प्राचार्य शुभांगी ताई ठमके, किनवट गट शिक्षण अधिकारी आर आर जाधव, विभागीय वन अधिकारी अशिष हिवरे, जी.डी .गिरी, आदी मान्यवर या धम्म परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

बौद्ध धम्म परिषदेच्या द्वितीय सत्रामध्ये दुपारी दोन वाजता बुद्ध भीम गीताचा व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे भिमशाहिर बापूराव जमदाडे, गायिका सुरेखा रंगारी चंद्रपूर, नालंदा सांगवीकर नांदेड रविराज भद्रे मुखेड गायक शंकर दादा गायकवाड भोसिकर यांचा गीताचा दणदणीत कार्यक्रम होणार आहे तर सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्रातील थोर सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांची सत्यवाणी यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे त्यांची जयत तयारी सुरू असून , डॉक्टर मनोज राऊत लक्ष्मण भवरे, परमेश्वर गोपतवाड, अनिल मादसवार, कानबा पोपूलवार , सुधाकर पाटील सोनारीकर, बालाजी राठोड, पांडुरंग मिरासे, शिवाजी ढोकळे ,शेख खय्युम, नागनाथ बच्चेवार, परमेश्वर वालेगावकर, अविनाश कदम ,बसवंत कांबळे ,नागोराव मेंढेवाड, सुभाष गुंडेकर ,केशव माने ,जगन्नाथ नरवाडे ,प्रताप लोकडे ,गौतम राऊत, गगाधर वाघमारे,शिवाजी डोखळे,अविनाश कदम विजय वाठोरे, गंगाधर गायकवाड.,शेख खय्युम यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. परिसरातील सर्व नागरिकांनी एकदिवशीय धम्म परिषदेमधील तिन्ही सतराच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजन समिती अध्यक्ष त्रिरत्न कुमार भवरे व निमंत्रक कैलासराव माने पोटेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

