Saturday, January 28, 2023
Home Uncategorized हायवा टिपर चोरणाऱ्या चोरटयांचे रॅकेट उघड; 05 हायवा टिपरसह 1,02,00,000/- रुपयाचा माल जप्त -NNL

हायवा टिपर चोरणाऱ्या चोरटयांचे रॅकेट उघड; 05 हायवा टिपरसह 1,02,00,000/- रुपयाचा माल जप्त -NNL

07 गुन्हे उघड; स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही

by nandednewslive
0 comment

नांदेड| मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा , नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु होते.

मागील एक वर्षामध्ये नांदेड जिल्हयामध्ये 07 हायवा टिपर चोरीचे घटना घडल्या होत्या. सदर हायवा टिपर चोरांचे टोळीचा शोध घेणे चालु होते. दि. 25/12/2022 रोजी श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नांदेड जिल्हयातील तसेच हिंगोली जिल्हयातील हायवा टिपर चोरी करणारा एक इसम हा मौजे वांगी ता. जि. नांदेड येथे आल्याचे समजले. हि माहीती पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिल्याने पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी व्दारकादास चिखलीकर यांना कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले.

पो. नि. स्थागुशा यांनी अधिकारी व अमंलदाराना घेवुन मौजे वांगी येथे जावुन सापळा रचुन आरोपी नामे लखन अवधुत जाधव वय 22 वर्ष रा. वांगी ता. जि. नांदेड यास पकडुन विचारपुस करता त्यांनी व त्याचे सोबत 1) जनार्धन ऊर्फ गजानन काळे रा. जालना 2) मेहराज सय्यद रा. औरंगाबाद 3) विष्णु आखात रा. जालना 4) प्रभु बामणे रा. जालना 5) लक्ष्मण गाडे रा. पाचोड जि. औरंगाबाद 6) हरी मखमले रा. जालना यांनी मिळुन नांदेड जिल्हयातील 06 व हिंगोली जिल्हयातील 01 हायवा टिपर चोरी केले असल्याचे सांगीतले.

नमुद टोळीतील चोरटयांचा शोध घेतला असता , 1) जनार्धन ऊर्फ गजानन काळे रा. जालना 2) मेहराज सय्यद रा. औरंगाबाद हे मिळुन आले. चोरी केलेल्या हायवा टिपर पैकी लखन जाधव याचेकडुन 01 , मेहराज सयद याचेकडुन 02 हायवा टिपर व जनार्धन ऊर्फ गजानन काळे याचेकडुन तोडलेल्या स्थितीतील 02 हायवा टिपरचे सुटे भाग असे एकुण 05 हायवा टिपर तसेच चोरीचा गुन्हा करताना वापरलेली स्कॉर्पिओ जिप असा एकुण 1,02,00,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. नमुद टोळीतील इतर आरोपीचा शोध घेणे चालु असुन नमुद टोळीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मिळुन आलेल्या आरोपीना पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 505/2022 कलम 379 भा द वि गुन्हयात तपासकामी देण्यात आले आहे.

banner

नमुद आरोपीतांकडुन 1) पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 505/2022 कलम 379 भा द वि 2) पो स्टे नांदेड ग्रामीण गुरनं. 314/2022 कलम 379 भा द वि 3) पो स्टे हदगांव गुरनं. 291/2022 कलम 379 भा द वि 4) पो स्टे रामतीर्थ गुरनं. 189/2022 कलम 379 भा द वि 5) पो स्टे देगलुर गुरनं. 545/2022 कलम 379 भा द वि 6) पो स्टे उस्माननगर गुरनं. 190/2022 कलम 379 भा द वि 7) पो स्टे वसमत जि. हिंगोली गुरनं. 285/2022 कलम 379 भा द वि असे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड , मा. श्री खंडेराव धरणे , अपर पोलीस अधीक्षक , भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक स्थागूशा, सपोनि/ पांडुरंग माने, पोउपनि/ सचिन सोनवणे, सपोउपनि / संजय केंद्रे, पोहेकॉ/ गंगाधर कदम, पोकॉ / देवा चव्हाण, तानाजी येळगे, मोतीराम पवार, रणधीर राजबन्सी, बजरंग बोडके, महेश बडगु, चापोकॉ/ अर्जुन शिंदे, शेख कलीम यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

 

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!