श्रीक्षेत्र माळेगाव मीडिया सेंटर| मौत का कुवा, नावातच अंगावर शहारे आणणारा अनुभव… जवळपास 50 फूट खोल लाकडी पाट्या आणि लोखंडापासून बनवलेला प्रत्यक्ष मृत्यूचा सापळा… आणि त्यावर चालू असतो मोटर सायकल व मिनी कारचा जीव घेणे अंगावर शहारे आणणारा थरार…
माळेगाव यात्रेत मौत का कुवा यात्रेकरूचे रंजन करीत आहे. हा खेळ पाहताना प्रेक्षकही जीव मुठीत धरून ठेवल्यासारखे पाहत राहतात. तीन मोटरसायकल प्रचंड वेगात गोल गोल फिरत राहतात… नंतर तीन मिनी कार त्याही वेगात… कित्येकदा नव्वद अंशाचा कोण होतो, थोडीशी जरी चूक झाली तरी प्रत्यक्ष मृत्यूच… पण या कलाकारांचे कौशल्य एवढे भन्नाट की, प्रेक्षकांचा श्वास जणू खेळ संपेपर्यंत रोखलेलाच राहतो.
एवढी जीवघेणी कसरत करताना भीती वाटते का असे विचारले असता त्यातला कारचालक नौशाद राजपूत म्हणाला, वैसे ये जिंदगी और मौत का खेल है, सर पे कफन बांधके ही हम कुऐ मे उतरते है, वक्त आयातो कुछभ भी हो सकता है. ही त्याची प्रतिक्रिया तेवढीच शहारे आणणारी होती. गाडी चिलवतांना हात सोडून गाडी चालवणे, एका बाजूला पाय सोडून बसने, कारमधून अर्धे बाहेर येऊन कार चालवण्याची कलाकारी ते दाखवतात. गाडी चालवतांना नियंत्रण व सातत्याने सराव आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
एकावेळी दोन ते तीनशे लोक मौत का कुवाचा शो पखहू शकतात. एका व्यक्तीला चाळीस रुपये टिकट ठेवला आहे. येथे आलेला हा मौत का कुवा भारतील नंबर एकचा असल्याचे चालक तरबेज गौर यांनी सांगितले. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यातील यात्रेत मौत का कुवाचे शो केले जातात. माळेगाव यात्रेत गेल्या 25 ते 30 वर्षांपासून साया अजिमेंट मौत कुवा माळेगाव यात्रेत येते.