नांदेड। सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन च्या वन कामगार कर्मचारी संघटनेच्या नाम फलकाचे अनावरण दि.२६ डिसेंबर रोजी मौजे वझरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोप वाटीका येथे किसान सभेचे राज्याचे नेते कॉ. किसन गुजर आणि जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभणे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदरील कार्यक्रमात सीटूचे हितचिंतक तथा गट ग्रामपंचायत वझरा – अजनीचे नव निर्वाचित सरपंच श्री दिपक केंद्रे आणि सुखदेव रनमले यांच्यासह नवनिर्वाचित सदस्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ.शंकर सिडाम आणि सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वन कामगार कर्मचारी संघटनेचे स्थानिक समितीचे अध्यक्ष कॉ. नीलकंठ (माऊली) जाधव,सचिव कॉ.मधुकर राठोड,उपाध्यक्षा कॉ.सजूबाई राठोड,सहसचिव कॉ.शकीला बी शेख ईनुस,कॉ.शकुंतला कौठेकर, कोषाध्यक्ष कॉ. डिगांबर टेंबरे, संघटक कॉ. भीमराव सिडाम, कॉ.दिलीप पाईकराव, कॉ.माधव धुप्पे, कॉ. गजानन पिसलवार, साईनाथ टेंबरे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वझरा गावठाण कृती समितीचे कार्याध्यक्ष कॉ.बाबू दोहीले, कोषाध्यक्ष कॉ.सुनील चांदेकर,कॉ.तुकाराम चांदेकर पेंटर, वसंत चव्हाण अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा कॉ. लता गायकवाड, कॉ.प्रयागबाई लोखंडे,कॉ.इंदिराबाई टेंबरे, जीवन दरोडे,आदींनी प्रयत्न केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी सीटू मध्ये जाहीर प्रवेश केला असून त्यांचे स्वागत कॉ.गाभणे यांनी केले.