कंधार, सचिन मोरे। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ.केशवरावजी धोंडगे ते गेल्या काही दिवसापासून आजारी असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू असल्याने यावर्षी 28 डिसेंबर रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम मी पूर्णतः रद्द केले. असल्याचे आव्हान माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे केले आहे.
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार चे सचिव माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांचा 28 डिसेंबर रोजी वाढदिवस असून लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात हा वाढदिवस विविध उपक्रमाद्वारे दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.पण काही दिवसापासून शेकपाचे ज्येष्ठ नेते डॉ.केशवराव धोंडगे यांच्या प्रकृतीमुळे कुरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
माझे सर्व मित्र सहकारी कार्यकर्ते श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे सर्व प्राचार्य प्राध्यापक व शिक्षक व शिक्षकत्तर बंधू-बहिणीने आपण प्रत्यक्ष माझ्या वाढदिवसानिमित्यांने मला शुभेच्छा देण्यासाठी माझ्या घरी कोणीही भेटीस येऊ नये फोनवरून तथा सोशल मीडिया वरून शुभेच्छा द्याव्यात मी आज पर्यंत आपल्या सदिच्छा मुळेच टिकून आहे.अशाच सदिच्छा व शुभेच्छा माझ्या पाठीशी असाव्यात असे नम्र आवाहन कुरुडे यांनी केले आहे.