Monday, February 6, 2023
Home नायगाव अँड भोसले मॅङम यांनी पिंपळ वृक्ष लागवड करून सामाजिक बांधिलकी जोपासली -NNL

अँड भोसले मॅङम यांनी पिंपळ वृक्ष लागवड करून सामाजिक बांधिलकी जोपासली -NNL

by nandednewslive
0 comment

नायगांव, रामप्रसाद चन्‍नावार। नायगांव येथील दिवाणी न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांना थंड सावली मिळावी या दूरदृष्टीने वृक्षप्रेमी तथा नायगांव न्यायालयाचे सरकारी वकील भोसले मॅडम यांनी दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी न्यायालयांच्या परिसरात नागरिकांना २४ तास ऑक्सिजन देणाऱ्या पिंपळ वृक्षाची लागवड करून सामाजिक बांधिलकी जपत त्या झाडाची मोठे होई पर्यंत देखभाल करणार असल्याचे सांगितले असून यामुळेच त्यांचे पक्षकारातून कौतुक केले जात आहे.

पिंपळाचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे.मात्र त्या सावलीचा आपल्या आरोग्यासाठी फायदा होतो याची तुम्हाला कल्पना आहे का? पिंपळाच्या झाडाला पौराणिक कथांमध्ये पूजलं जाते पण त्याचा खरा फायदा होतो तो आरोग्यासाठी. पिंपळाच्या झाडाचे महत्व खूप आहे. हे असं झाड आहे जे दिवसातील २४ तास नागरीकांना ऑक्सिजन मिळवून देतं. याच्या सावलीचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होतो. त्यामुळे प्रत्यकाने एका वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांधिलकी जपावे असे नायगांव न्यायालयाचे सरकारी वकील भोसले मॅडम यांनी दैनिक श्रमिक एकजूट शी बोलतांना सांगितले.

आपण जर बारकाईने लक्ष दिले तर आपल्याला लक्षात येईल की, मानवाचे आयुष्य पृथ्वीवर टिकवून ठेवण्यासाठी व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी वृक्ष किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे वृक्ष नसते तर आपले जीवन जितके सुरळीत चालले आहे तितके सुरळीत चालले नसते. मात्र भरपूर प्रमाणात वृक्षतोड तोड होत आहे.त्यामुळे कडक उन्हाळा, प्रदूषण आणि तापमानवाढ अशा समस्या दिवसेंदिवस उद्भवत आहेत. तसेच झाडांची कमी होत चाललेली संख्या यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच आपले ऋतुचक्रही बदलत चालले आहे.

त्यामुळे अशा समस्यांपासून आपल्याला आपला आणि सभोवतालच्या पर्यावरणाचा बचाव करायचा असेल तर वृक्षलागवड करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेऊन सरकारी वकील भोसले मॅङम यांनी पिंपळ वृक्ष लागवड केले आहे. यावेळी नायगांव न्यायालयाचे सरकारी वकील भोसले मॅङम ,एम.एस.नरवाडे ,अँड.एस.जी. कोकणे, अँड.पि.एम.वाघमारे, अँड.मांजरमकर, शैलेश मगिरवार ,पोकॉ.रावसाहेब कदम ,पो.हे.कॉ.शिंदे ,पो.कॉ.वर्षाताई पो कॉ.निकम यांची उपस्थिती होती.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!