नविन नांदेड। गुरुकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित शाकंभरी नवरात्र महोत्सव निमित्य श्रीमद् देवी भागवत कथा व किर्तन सोहळा दि. २९ डिसेंबर २२ पासून ०७ जानेवारी २३ पर्यंत भागवताचार्य अनिल महाराज (माजलगावकर) यांच्या सुमधुर वाणीतुन सिडको परिसरातील एन.डी.४१ सिध्दी अष्टविनायक गणपती मंदिर जवळ दंत नगर सिडको येथे होणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरू कृपा महिला भजनी मंडळ सिडको यांच्या वतीने भागवत कथा आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी साथ संगत ह.भ.प.भाऊराव कनकापुरे तबला वादक ,ह.भ.प.माधव कुडाळे पेटी वादक , बाबाराव पाचंगे संबळ वादक गुरुकृपा महिला मंडळ, सिडको, आयोजित श्रीमद देवी भागवत कथा कार्यक्रम प्रसंगी भागवत कथे मध्ये दैनंदिन मध्ये मंगलचरण, व्यासाचे तप हयग्रीव अवतार मत्स्योदरी व्यास जन्मेजेय संवाद भुवनेश्वरी कथा सर्व देवी महिमा, विश्वउत्पती सुदर्शन देवी दर्शन (क्लीम बिज) सुबाहु देवी स्तुती नवरात्री विधान, कुमारीका पुजन, महिषासूर, तेजापासुन देवी प्रगट शुंभ निशुंभ वध, सुरत राजा, पुजा विधी, कुकुंमार्चन हरिश्चंद्र व्याख्यान, शक्तीचा प्रार्दुभाव, नरक कुंड वर्णन षष्टी तुळशी व्याख्यान, भ्रामरी देवी।देवता गर्वखंड, फल श्रुत्ती चे भागवत कथे मध्ये अध्ययन होणार असून काला किर्तन आणी महाप्रसाद ह.भ.प अनिल महाराज माजलगांवकर यांच्या किर्तनानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल.
हा भागवत कथा कार्य समितीचे सौ.प्रतिभा कुलकर्णी अध्यक्ष, सौ. सुनंदा वट्टमवार उपाध्यक्ष, सौ.राजाबाई सोलापुरे सचिव सौ. सुनिता ठाकूर सहसचिव, श्रीमती गिरजाबाई तेलंग(कोषाध्यक्ष),श्रीमती पार्वतीबाई पद्मणे (सदस्य), सौ.सुलाबाई खानजोडे (सदस्य), सौ. चंद्रकलाबाई गिरी (सदस्य), सौ.गोदावरी लव्हराळे (सदस्य), सौ.गिता पेटकर (सदस्य), सौ.पार्वती राहेगावकर (सदस्य)मंडळ,सिडको व मार्गदर्शक प्रा.डॉ. राजकुमार उदगिरकर, शंकरराव काचावार प्रभाकर कुलकर्णी, दिलीप महाजन, यांच्या प्रयत्नामुळे होत आहे.