
भोकर, गंगाधर पडवळे। महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगीतच्या किनी तालुका भोकर गावशिवाराततील एका बंद राईस मिल मध्ये सुरु असलेल्या जुगार अद्द्यावर दि.२७ डिसेंबर २०२२ रोजी भोकर पोलिसांनी छापा टाकून तो जुगार अड्डा उद्धवस्त केला असून या धाडसी कारवाईत १७ जुगारी रोख १ लाख रुपये १६ किमती मोबाईल ७ दूचाकी १ चारचाकी व जुगार साहित्य असा एकूण १५ लाख ८२हजार ७७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तेलगांना महाराष्ट्र राज्यसीमे लगत असलेल्या मौजे किनी तालुका भोकर शिवरात एक अंतराराज्य बंद असलेल्या लक्ष्मी नृसिंम्हा राईस मिल मध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती भोकर पोलिसांना मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी पो.उप.नि.दिगंबर पाटील, अनिल कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद बाचेवाड, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सरोदे, चंद्रकांत आर्किलवाड, सय्यद मोईन, विकास राठोड, प्रकाश वावळे, महिला पोलीस नाईक सिमा वच्छेवार यासह आदी पोलीस कर्मचारी सोबत घेऊन दि.२७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ०३:३० वाजताच्या दरम्यान उपरोक्त बंद राईस मिल मध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सापळा रचून छापा टाकला. यावेळी तेलंगाणा व महाराष्ट्र राज्यातील काही उच्चभ्रू लोक पत्यांचाजुगार खेळतांना मिळून आले.त्या जुगाऱ्यांना ताब्यात घेत पोलीस निरीक्षक विकास पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी हा जुगार अड्डा उध्वस्त केला. असून जुगार खेळणाऱ्या त्या जुगाऱ्यांकडून रोख १ लाख रुपये, व उपरोक्त उल्लेखीत एकूण १५ लाख ८२हजार ७७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

त्या जुगार्यांना भोकर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्या जुगार अड्डा चालवणाऱ्याचे नाव संजीव रेड्डी रा. किनी ता. भोकर असल्याची माहिती समोर आली असून ताब्यात घेतलेल्या अन्य १६जुगाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.१)संतोष खलशे रा. दहेगाव २)गणेश कदम रा. निघवा ३)श्रीनिवास जाधव रा. रंजणी ४)राजकुमार बालिजापल्ली ५) आनंद राठोड रा. डोडरणातांडा ६)देवाला अंकाम रा. भोशी ७)मल्लेश नारडे रा. कुबेर ८)बालाजी घोसालवाड रा. बोळासा ९)विठ्ठल गोपवाड रा. गोडसरा १०)देविदास येनकुसाब रा. निघवा ११)गजराज पळसे रा. पळशी १२)सत्यनारायण शिंदे रा. दहेगाव १३)सुरेश ठाकूर रा. पळशी वरील सार्वजन तालुका मुधोळ जिल्हा निर्मल तेलंगणा राज्य व १)श्रीनिवास कदम रा. लगळूद २)गोविंद जाधव रा. महागांव ३)दिलीप जाधव रा. लगळूद वरील तिघे तालुका भोकर जिल्हा नांदेड येथील आल्याचे समजले.

तसेच सरकार पक्षा तर्फे पोलीस उपनिरीक्षक दिंगंबर पाटील यांच्या फिर्यादीवरून जुगार अड्डा चालवीणाऱ्या बंद राईस मिल मालकासह उपरोक्त एकूण १७ जुगाऱ्या विरुद्ध मुंबई पोलीस जुगार कायदा प्रमाणे भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पो. नि. विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास सुरु आहे.तेलंगणा महाराष्ट्र राज्य सीमे लगत असलेल्या गावातील हा जुगार अड्डा भोकर पोलिसांनी उध्वस्त केल्याने जुगारीत एकच खळबळ उडाली असून छापा टाकते वेळी काही जुगारिंनी पळ काढला आहे.

