Saturday, January 28, 2023
Home कंधार माधव गोटमवाड यांना” उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित -NNL

माधव गोटमवाड यांना” उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित -NNL

by nandednewslive
0 comment

उस्माननगर, माणिक भिसे। पुण्याहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक चालू वार्ताचे संपादक डी.एस.लोखंडे पाटील यांनी कंधार तालुका प्रतिनिधी माधवराव गोटमवाड यांच्या लिखाणाच्या शैलीची दखल घेऊन उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्काराने मुखेड येथे घेण्यात आलेल्या वार्षीक स्नेह मेळाव्यात गौरविण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील दैनिक चालूवार्ता पत्रकार-प्रतिनिधींच्या वतीने आयोजित ‘वार्षिक स्नेह मेळावा-2022 दिनांक 25 डिसेंबर 2022 वार रविवारी मुखेड येथील जिजाऊ मंदीर पब्लिक इंग्लिश स्कूल मध्ये स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.

दै.चालू वार्ताचे संपादक डी एस लोखंडे पाटील यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणते राजे तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास, भारतीय घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करुन व शाल , पुष्पहार श्रीफळ सदर महापुरुषांच्या आदर्शवत अशा कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला गेला.

दैनिक चालू वार्ता या मराठी दैनिकाच्या उन्नतीसाठी आणि येणाऱ्या काळात ब्रॅण्ड बनविण्यासाठी संपादक डी.एस. लोखंडे सरांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.सुमारे दहा लाख वाचकांकडून वाचले जाणारे आपले वृत्तपत्र आगामी काळात घराघरांत पोहोचले गेले पाहिजे, असाही मौलिक सल्ला दिला. त्याचबरोबर गोर-गरीब, रंजले-गांजले, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रतिनिधींनी सज्ज राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर प्रयत्न केले पाहिजे. शासन-प्रशासन स्तरावर योग्य ते पुरावे असूनही दाद मिळत नसेल तर अर्ध्या रात्री मला फोन केला तरी त्यासाठी मी प्रथम स्थानी राहून न्याय मिळवून देईन असे अभिवचन ही लोखंडे पाटील यांनी दिले.

banner

दैनिक’चालू वार्ता’ या मराठी दैनिकाचे कंधार तालुका प्रतिनीधी माधव गोटमवाड यांचा वृतपत्राचे मुख्य संपादक मा. डी एस लोखंडे पाटील यांच्या हस्ते दि. 25 डिसेंबर 2022 रोजी ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील दैनिक चालू वार्ता दैनिकाच्या पत्रकार-प्रतिनिधींच्या वतीने आयोजित ‘वार्षिक स्नेह मेळावा-२०२२’ या सोहळ्यासमयी पत्रकार माधव गोटमवाड यांचा सन्मान चिन्हरुपी ट्रॉफी पुरस्कार, शाल, मेडल देऊन गौरव करण्यात आला.

मुखेड येथील ज्येष्ठ पत्रकार,साहित्यिक, कवी तथा जिजाऊ मंदीर पब्लिक इंग्लिश स्कूलचे संस्थापक ज्ञानोबा जोगदंड यांच्या भव्य शैक्षणिक वास्तूमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश जमदाडे यांनी केले तर आभार शिवकुमार बिरादार यांनी मांडले. यावेळी उपस्थित नांदेड उत्तर प्रतिनीधी समर्थ लोखंडे, मराठवाड्याचे उपसंपादक ओंकार लव्हेकर, मुख्य संपर्क प्रतिनिधी भरत पवार, परभणी जिल्हा उपसंपादक दत्तात्रय वामनराव कराळे,लातूर जिल्ह्याचे कार्यकारी उपसंपादक प्रा.मारोती पाटील बुद्रुक, नांदेड जिल्हा उपसंपादक गोविंद पवार, नांदेड जिल्हा प्रतिनिधी विश्वास खांडेकर, नांदेड प्रतिनीधी प्रा.यानभूरे जयवंत, पूण्यातील शिंदेवाडी गावचे सरपंच विकास मोरे, कंधार ग्रामीण प्रतिनिधी बाजीराव पाटीलग कळकेकर , अहमदपूर प्रतिनीधी रमेश राठोड यांच्यासह शेकडो पत्रकारांची उपस्थिती लाभली होती. यावेळी उत्कृष्ट पत्रकारितेमध्ये अनेक पत्रकारांचा यथोचित मान-सन्मान करण्यात आला.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!