Saturday, January 28, 2023
Home पुणे युवक क्रांती दलाच्या कार्यवाह पदी जांबुवंत मनोहर;आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण देण्याचा संकल्प -NNL

युवक क्रांती दलाच्या कार्यवाह पदी जांबुवंत मनोहर;आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण देण्याचा संकल्प -NNL

संघटनवाढ,शेतकरी, विद्यार्थी, दुर्बल घटकांसाठी विशेष कार्यक्रम

by nandednewslive
0 comment

पुणे| युवक क्रांती दलाच्या कार्यवाह पदावर जांबुवंत मनोहर यांची निवड झाली आहे.जांबुवंत मनोहर हे युवक क्रांती दलाचा लढाऊ चेहरा मानले जातात.ही नियुक्ती ३ वर्षांसाठी आहे.’संघटना वाढविण्यासाठी महाराष्ट्र भर दौरा काढणार असून युवती आणि महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, आंतरजातीय -आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण, शेतकरी, विद्यार्थी आणि दुर्बल घटकांसाठी विशेष कार्यक्रम येणाऱ्या काळात राबविण्यात येणार आहेत’,अशी माहिती या निवडीनंतर बोलताना जांबुवंत मनोहर यांनी दिली.

युवक क्रांती दलाची राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी पुण्यात पार पडली. या बैठकीत राज्य कार्यवाहपदी जांबुवंत मनोहर यांची एकमताने निवड झाली.युक्रांदचे जेष्ठ नेते अन्वर राजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी, सदस्य निवडण्यात आले. युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते गांधी भवन येथे नियुक्ती पत्रे देऊन अभिनंदन करण्यात आले.

युक्रांद च्या राज्य उपाध्यक्षपदी संदीप बर्वे, राज्यसंघटक पदी अप्पा अनारसे, सहकार्यवाह पदी राजकुमार डोंबे व डॉ. रश्मी सोवनी, मराठवाडा संघटक शाम तोडकर यांची निवड करण्यात आली. यावेळी युवक क्रांती दलाचे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुदाम लगड, नीलम पंडीत, सुदर्शन चखाले, प्रसन्न मराठे, विवेक काशीकर, रोहन गायकवाड, मयुर शिंदे,आदित्य आरेकर, दीपक मोहिते, आबेद सय्यद उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!