भोकर। तालुक्यातील मौजे रायखोड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ह.भ.प.वै. ब्रह्मनिष्ठ विठ्ठल महाराज सांडोळकर यांच्या प्रेरणेतून दिनांक २७ डिसेंबर २०२२ ते दिनांक ३ जानेवारी २०२३ पर्यंत होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली असून रोज दुपारी १२ ते ४ या वेळेत रामायणाचार्य ह.भ.प. महेशजी महाराज आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून संगीत राम कथा होत आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम खालील प्रमाणे आहेत. सकाळी ४ ते ६ काकडा भजन,७ ते ११ संत तुकाराम अभंग गाथा पारायण,११ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते ४ राम कथा सोहळा,४ ते ५ भावार्थ रामायण ग्रंथ वाचन,सायंकाळी ६ ते ७:३० हरिपाठ व रात्री ९ ते १२ मान्यवर संतांची हरिकीर्तने खालील प्रमाणे. दि.२८ डिसेंबर हभप सुनील महाराज लांजोळकर, दि.२९ डिसेंबर हभप दौलत महाराज बोडखे आळंदीकर, दि.३०डिसेंबर हभप परमेश्वर महाराज शहापूरकर, दि.३१डिसेंबर हभप महेशजी महाराज आळंदीकर,
दि.१जानेवारी २०२३ हभप अजय महाराज आळंदीकर, दि.२ जानेवारी हभप भास्कर महाराज सांडोळकर यांची हरिकीर्तने होतील या कीर्तनास मोजे हळदा,कामनगाव, मातुळ, सायाळ, हसापूर, मोघाळी,नागापूर, रायखोड आदी गावातील भजनकऱ्यांची साथ मिळणार आहे.
दि.३ जानेवारी २०२३ रोज मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ह.भ.प.माऊली ज्ञानेश्वर महाराज कोठुळे यांचे काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसाद वाटपाला सुरुवात होणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमांचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन समस्त रायखोडकर ग्रामस्थांनी केले आहे.