Saturday, January 28, 2023
Home Uncategorized सहलींमुळे अनुभवाच्या कक्षा रुंदावतात – गंगाधर ढवळे -NNL

सहलींमुळे अनुभवाच्या कक्षा रुंदावतात – गंगाधर ढवळे -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत ‘सहल’ या उपक्रमामुळे जिवंत अध्ययन अनुभव देता येतात. तसेच सहलीमुळे बालकांच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात, असे प्रतिपादन येथील साहित्यिक तथा मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी केले.

यासाठी बंदिस्त भिंतीच्या आतील अभ्यासक्रम एक दिवस टाळून सहलीचे आयोजन करण्यात येते. म्हणूनच जवळा (दे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची सहल नांदेडच्या गुरुद्वारा येथे आयोजित करण्यात आली होती. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सहशिक्षक संतोष घटकार, आनंद गोडबोले, सूरज गवळी, मिलिंद गोडबोले, संघरत्न गोडबोले, साईनाथ गोडबोले आदींची उपस्थिती होती.

सहलीच्या निमित्ताने परिसरातील भौगोलिक तथा ऐतिहासिक माहिती मिळवण्यासाठी जवळा येथील जि. प. शाळेच्या मुलांनी वडेपुरी येथील रत्नेश्वरी, अन्नपूर्णा देवी मंदिर, तसेच झरी येथील गुरुद्वारा, विष्णूपुरीचे काळेश्वर मंदिर, जलाशय, नांदेड येथील गुरुद्वारा, दाभडचे महाविहार, सत्यगणपती आदी ठिकाणांना भेट दिली. या ठिकाणांशी संबंधित माहिती मिळवली. प्रत्येक ठिकाणचे वेगळे महत्त्व आहे. यामुळे निरीक्षणे तथा माहितीचे संकलन आणि सारणीकरण हे कौशल्य आत्मसात करता आले.

यानिमित्ताने सहभोजनाचा आनंदही मुलांनी घेतला. तसेच शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी कसे पालन केले पाहिजे याचे खरेखुरे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी घेतले. ज्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक असते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्यास सक्त केली गेली. सहलीच्या स्थळांचे पावित्र्य टिकविणे, कुठलीही नासधूस करु नये, आपल्यासोबतचा कचरा कचराकुंडीतच टाकणे आदी सूचनांचे विद्यार्थ्यांनी तंतोतंत पालन केले.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!